मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajapur Crime News : मुंबई-गोवा महामार्गावर टोलनाक्याची तोडफोड, पोलिसांकडून मनसैनिकांना अटक

Rajapur Crime News : मुंबई-गोवा महामार्गावर टोलनाक्याची तोडफोड, पोलिसांकडून मनसैनिकांना अटक

Aug 18, 2023, 06:56 AM IST

    • Kokan Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाका अज्ञात आरोपींनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Rajapur Crime News Marathi (HT)

Kokan Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाका अज्ञात आरोपींनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    • Kokan Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाका अज्ञात आरोपींनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Rajapur Crime News Marathi : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातल्या टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी हातिवले येथील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपींनी टोलनाक्यावरील केबिन आणि अन्य ठिकाणची मोडतोड केल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातल्या हातिवले येथील टोलनाक्यावर दाखल होत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने चांगलाच धूडगूस घातला. आरोपींनी टोलनाक्यावरील केबीनची तोडफोड केली असून अन्य साहित्य आणि ऑफिस फोडले आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. परंतु राजापुरमध्ये घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र नवननिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमधील मनसेच्या निर्धार मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. याशिवाय यावरून त्यांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनांवरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. परंतु आता पनवेलमधील मनसेचा निर्धार मेळावा संपताच आता राजापुरात टोलनाका फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता आरोपी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या