मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jumbo Covid Center Scam : संजय राऊतांचे निकटवर्तीय राजीव साळुंखेंना अटक, कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात पोलिसांची कारवाई

Jumbo Covid Center Scam : संजय राऊतांचे निकटवर्तीय राजीव साळुंखेंना अटक, कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात पोलिसांची कारवाई

May 01, 2023, 01:00 PM IST

    • Jumbo Covid Center Pune : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळा प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
Jumbo Covid Center Scam In Pune (HT_PRINT)

Jumbo Covid Center Pune : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळा प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

    • Jumbo Covid Center Pune : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळा प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

Jumbo Covid Center Scam In Pune : कोरोना महामारीच्या काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय राजीव साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्यात राजीव साळुंखे, संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचा थेट हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

पुण्यातील शिवाजीनगर येथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. त्याचं कंत्राट संजय राऊत यांच्या मर्जीतील लोकांना देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याशिवाय राऊत यांच्यासह अन्य तिघांनी या प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आता पोलिसांनी राजीव साळुंखे यांना अटक केली असून सुजीत पाटकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याशिवाय या प्रकरणात खासदार संजय राऊत यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमध्ये धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल, आता पोलीस काय करणार?

आणखी तिघांना अटक होणं बाकी- सोमय्या

पुण्यातील शिवाजीनगरच्या जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेला अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणात ते एकटेच आरोपी नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता आणि संजय शहा हे देखील आरोपी आहेत. त्यामुळं आता राजीव साळुंखेला अटक झालेली असली तर इतरांना अद्याप अटक होणं बाकी असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना बोगस कंपन्यांना जम्बो कोविड सेंटरची कंत्राटं देण्यात आली. त्यामुळंच अनेक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची कारवाई होणारच असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या