मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai ex mayor arrested : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ; मुंबईच्या माजी महापौरांना अटक

mumbai ex mayor arrested : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ; मुंबईच्या माजी महापौरांना अटक

Nov 29, 2023, 11:34 AM IST

  • Ex mayor datta dalvi arrested : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणादरम्यान शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहराचे माजी महापौर, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ; मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक

Ex mayor datta dalvi arrested : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणादरम्यान शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहराचे माजी महापौर, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक केली.

  • Ex mayor datta dalvi arrested : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणादरम्यान शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहराचे माजी महापौर, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहराचे माजी महापौर, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक केली. २६ नोव्हेंबर रोजी भांडुपमध्ये कोकणवासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांचं भाषण झालं होतं. या भाषणात दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन शिवीगाळ केली होती, असा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. दत्ता दळवींविरोधात शिंदे गटाचे कार्यकर्ते भूषण पलांडे यांनी भांडुंप पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली. दत्ता दळवी यांच्याविरोधात दंड संहितेच्या कलम १५३ (अ), १५३ (ब), १५३(अ)(१) सी,२९४, ५०४, ५०५ (१) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दत्ता दळवी यांना आज सकाळी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांचे भाषण झाले. राजस्थान विधानसभेच्या प्रचारासाठी गेले असताना बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ असं लिहिलं होतं. या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या भाषणात लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत असताना दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्ते पलांडे यांनी केला होता. दत्ता दळवी हे शिवसेना- ठाकरे गटाचे उपनेते असून २००५ ते २००७ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते.

भांडुप पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

दरम्यान, दत्ता दळवी यांच्या अटकेच्या निषेधार्ह शिवसेना ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत, आमदार सुनील राऊत आणि स्थानिक कार्यकर्ते भांडुप पोलिस स्टेशन येथे दाखल झाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जमा होऊन यावेळी घोषणाबाजी केली.

पुढील बातम्या