मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune news: पुण्यात आज पादचारी राजा! विशेष दिनानिमित्त पीएमपीच्या जादा गाड्या; लक्ष्मी रस्त्याच्या पीएमपीच्या मार्गात बदल

Pune news: पुण्यात आज पादचारी राजा! विशेष दिनानिमित्त पीएमपीच्या जादा गाड्या; लक्ष्मी रस्त्याच्या पीएमपीच्या मार्गात बदल

Dec 11, 2023, 07:45 AM IST

    • Pune pedestrian day : पुणे महानगर पालिकेने आज शहरात पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. या साठी लक्ष्मी रस्ता आज फक्त पायी चालणाऱ्यासाठी खुला असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
Pune pedestrian day

Pune pedestrian day : पुणे महानगर पालिकेने आज शहरात पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. या साठी लक्ष्मी रस्ता आज फक्त पायी चालणाऱ्यासाठी खुला असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

    • Pune pedestrian day : पुणे महानगर पालिकेने आज शहरात पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. या साठी लक्ष्मी रस्ता आज फक्त पायी चालणाऱ्यासाठी खुला असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

पुणे : पुणे महानगर पालिकेतर्फे आज पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. या दिनामित्त आज पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्ता हा आज वाहनविरहित ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पादचारी दिनानिमित्त पीएमपी प्रशासनाने आज जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून पुणेकरांच्या सेवेला दर ३० मिनिटांच्या वारंवारितेने या गाड्या धावणार आहे. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील गाड्यांच्या संचलनात देखील पीमपीने बदल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

कसाऱ्याजवळ मालगाडी घसरली; कोणत्या गाड्यांचे मार्ग बदलले अन् कोणत्या गाड्या झाल्या रद्द? वाचा

पुणे महानगर पालिकेने आज पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. या साठी आज लक्ष्मी रस्ता हा वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ८ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून पादचाऱ्यांना विना अडथळा नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौकादरम्यान चालता येणार आहे.

Sanjay Raut: सोलापुरात संजय राऊतांच्या वाहनावर चप्पलफेक; नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

एरवी वाहनांनी गजबजलेल्या या मार्गावर आज फक्त पादचारी दिसणार आहे. या दिनानिमित पीएमपीने देखील विशेष नियोजन केले असून असून सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत अर्ध्या तासांच्या वारंवारितेने गाड्या या सोडल्या जाणार आहेत.

पादचारी दिनाचे असे आहे नियोजन

-पादचाऱ्यांच्या सोयीसाठी नगरकर तालीम चौक-बाजीराव रस्ता-महापालिका भवन ते नगरकर तालीम या मार्गावर तीस मिनिटांच्या वारंवारीतेने तर स्वारगेट-उंबऱ्या गणपती चौक-स्वारगेट मार्गावर चाळीस मिनिटांच्या वारंवारीतेने गाड्या धाववणार आहेत.

-डेक्कन-उंबऱ्या गणपती चौक-डेक्कन य मार्गावर दर तीस मिनिटांनी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय मेट्रो स्थानक येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी शिवाजीनगर रेल्वे स्थानक ते स्वारगेट या मार्गावरील जिल्हा सत्र न्यायालय मार्गे तर चार मिनिटांच्या वारंवारीतेने संचलनात ठेवण्यात येणार आहेत.

-पुण्यदशम मार्ग क्रमांक ७ आणि ९ बंद राहणार असून मार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने आणि शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून नियमित संचलनात राहणार आहेत.

-मार्ग क्रमांक ८१, १४४, १४४अ, १४४ क आणि २८३ मार्गावरील गाड्या पुणे स्थानकाकडे जाताना नियमित मार्गाने आणि पुणे स्थानकावरून येताना महापालिका भवन मार्गे संचलनात राहणार आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या