मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Supply : पुण्यात उद्यापासून पाणीकपात लागू, आठवड्याच्या ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Supply : पुण्यात उद्यापासून पाणीकपात लागू, आठवड्याच्या ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

May 17, 2023, 11:41 AM IST

    • Pune Water Supply News : पीएमसीच्या निर्णयामुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागणार आहे.
pune water supply news thursday (HT)

Pune Water Supply News : पीएमसीच्या निर्णयामुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागणार आहे.

    • Pune Water Supply News : पीएमसीच्या निर्णयामुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागणार आहे.

pune water supply news thursday : उन्हाळा सुरू झाल्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळं आता पुणे महापालिकेने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्याच्या दर गुरुवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असून या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. त्याचबरोबर उद्या शहरातील टँकर केंद्रेही बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं पुढील काही दिवस शहरवासियांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

पुणेकरांना दररोज १४०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी या चारही धरणांमध्ये केवळ ८.८६ टीएमसी इतकंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळं आता जून आणि जुलै महिन्यांपर्यंत पाण्याची कमतरता जाणवू नये, यासाठी जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेने शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या गुरुवार असल्यामुळं शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे, शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरातील उपनगरीय भाग असलेल्या बालेवाडी, पाषाण, बाणेर, बावधन आणि हडपसर या भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय पालिकेकडे शहराच्या अनेक भागातून पाण्याची मागणी करणारे फोन येत आहे. त्यानंतर आता पालिकेकडून शहरात तब्बल सहा हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळं पुणेकरांची मोठी गैरसोय होणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या