मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shahapur Accident : शहापूर दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Shahapur Accident : शहापूर दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Aug 01, 2023, 05:02 PM IST

    • Samruddhi Mahamarg Thane accident : ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने १६ मजूर ठार झाले. तर चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत.
Samruddhi Mahamarg Thane grader machine collapse

Samruddhi Mahamarg Thane accident : ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने १६ मजूर ठार झाले. तर चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत.

    • Samruddhi Mahamarg Thane accident : ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने १६ मजूर ठार झाले. तर चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत.

ठाणे : ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना मंगळवारी मध्यरात्री गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने १६ मजूर ठार झाले, तर चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख; व्यक्त करत मृतांप्रती श्रद्धांजली व्यक्त केली आहे. या सोबतच पीएम केअर फंडातून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Samruddhi Mahamarg: ठाण्यात समृद्धी महामार्गावर एनडीआरएफतर्फे बचाव कार्य सुरू; दोन पथक दाखल, मृतांचा आकडा १६ वर

ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे या ठिकाणी सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम करत असतांना मोठी दुर्घटना घडलीय. या ठिकाणी गर्डर मशिन कोसळून तब्बल १६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. त्यांनी घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले आहे. आता पर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढीगाऱ्या आणखी काही जण दबले असल्याची शक्यता आहे.

Pune Bhimashakar : भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्याला पडले भगदाड; रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घटनेची दखल घेत या दुर्घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे.महाराष्ट्रातील शहापूर इथं झालेली भीषण दुर्घटना अतिशय दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांनी श्रध्दांजली अर्पण केली.

अपघातातील जखमींना लवकर आराम मिळावा ही प्राथर्ना. पीएम मोदी यांनी पंतप्रधान केअर फंडातून तत्काळ मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश यांनी दिले आहेत.

दुर्घटनेतील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी : देवेंद्र फडणवीस

शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी : अजित पवार

शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या