मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar on Phd : पीएचडी करून ते काय दिवे लावणार?; अजित पवारांच्या वक्तव्यानं विद्यार्थी नाराज

Ajit Pawar on Phd : पीएचडी करून ते काय दिवे लावणार?; अजित पवारांच्या वक्तव्यानं विद्यार्थी नाराज

Dec 13, 2023, 07:11 PM IST

  • नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे.

Deputy CM Ajit Pawar on Phd Students

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे.

  • नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्यामुळं राज्यात पीएचडी करणारा विद्यार्थीवर्ग नाराज झाला असल्याचे दिसतय. ‘पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत..’, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी काल, नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत केलं होतं. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील विद्यार्थ्यांची अशाप्रकारे थट्टा करू नये, असा सल्ला विरोधी पक्ष नेत्यांनी अजित पवार यांना दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

‘सारथी’ या संस्थेतर्फे राज्यातील मराठा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांबाबत प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानपरिषदेत चर्चा झाली. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत ‘सारथी’च्या माध्यमातून फक्त २०० विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. ही संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी सतेज पाटील यांची केली.परंतु सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून सतेज पाटलांना आश्चर्याचा धक्का बसला. ‘अहो दादा, असं का म्हणताय? या योजनेमुळं राज्यात पीएचडीधारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही.’ असं सतेज पाटील म्हणाले. सतेज पाटील यांच्या शेजारच्या बाकावर बसलेल्या कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पीएचडी विद्यार्थ्यांबाबतचं विधान ऐकून डोक्याला हातच लावलेला दिसला.

अजित पवारांनी दिलं उत्तर…

सतेज पाटील यांच्या मागणीवर अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘आम्ही यावर फेरविचार करू. ही मागणी मान्य होईलच असं सांगता येत नाही. गरजेचं असेल तर सहानुभूतीपूर्वक विचार करू. मला असं वाटतं की, या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह, आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएससारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. यंदा एमपीएससी, यूपीएससीत आपल्या पोरांनी मोठं यश मिळवलं आहे. या परिक्षांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, खारघर (नवी मुंबई) आणि नाशिकमध्ये आपण सारथीचं केंद्र उभं करणार आहोत’ असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. राज्यात विविध विद्यापीठांमध्ये पीएचडी करणारे विद्यार्थी नाराज झाले असल्याचं दिसून येत असून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.

पुढील बातम्या