मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Bandh: मराठा आरक्षणासाठी आज परभणी बंदची हाक; बाजारपेठा राहणार बंद

Parbhani Bandh: मराठा आरक्षणासाठी आज परभणी बंदची हाक; बाजारपेठा राहणार बंद

Nov 01, 2023, 08:36 AM IST

    • Parbhani Bandh for Maratha Reservation : परभणीत आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Parbhani Bandh for Maratha Reservation :

Parbhani Bandh for Maratha Reservation : परभणीत आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    • Parbhani Bandh for Maratha Reservation : परभणीत आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Parbhani Bandh for Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाने राज्यभरात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, राज्यात बीड, धाराशिव, परभणी, संभाजी नगर या ठिकाणी आंदोलन हिंसक झाले. दरम्यान, आज मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातीस सर्व बाजारपेठा या बंद राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Maharashtra weather update : राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा तर काही ठिकाणी तापमान वाढणार; असा आहे हवामानाचा अंदाज

परभणी बंद संदर्भात सकल मराठा समाजाची बैठकीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज परभणी जिल्ह्यात सर्व गावात हे आंदोलन केले जाणार आहे. या वेळी सरकारकहा निषेध केला जाणार आहे. परभणीत तीन ठिकाणी तर जिल्हाभरात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. बंद असल्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक, बाजारपेठा, बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारने त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Lalit Patil : ललित पाटीलसह तीन आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात! अनेक गुपित होणार उघड

मंगळवारी देखील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होते. यामुळे जिल्ह्यात अनेक व्यापाऱ्यांनी याची धास्ती घेत हिंसक आंदोलन झाल्यास नुकसान होऊ नये यासाठी दुकाने आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

मराठवाड्यात आंदोलक हिंसक, अनेक गाड्या फोडल्या

मराठवाड्यात आंदोलक आक्रमक झाले आहे. बीडमध्ये दोन आमदारांची घरे जालन्यात आली. यामुले मोठे नुकसान झाले होते. या मुळे राजकीय नेत्यांनी आंदोलकांचा चांगलाच धसका घेतला आहे. त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मारठवड्यात काही अधिकाऱ्यांचा देखील गाड्या फोडण्यात आल्या तर काही गाड्या जालन्यात आल्या.

पुण्यात देखील मंगळवारी आंदोलक हिंसक झाले होते. पुण्यातील नवले ब्रिज येथे मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले होते. त्यांनी बऱ्याच वेळ पुणे बंगलोर रस्ता हा रोखून धरला होता. यामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदी

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चे काढण्यास परवानगी देणात आलेली नाही. पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास तसेच शस्त्र बाळगल्यास कारवाई करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या