मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत; महादेव जानकर यांनी सांगितलं कारण

Pankaja Munde : पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत; महादेव जानकर यांनी सांगितलं कारण

Sep 01, 2022, 01:46 PM IST

    • Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे, त्यातच आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
mahadev jankar on pankaja munde today (HT)

Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे, त्यातच आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

    • Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे, त्यातच आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

mahadev jankar on pankaja munde today : शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही आता झाला असून त्यात महिलांना, अपक्षांना आणि मित्रपक्षांना संधी न देण्यात आल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता त्यांनी शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारात रासपला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी मोठा विधान केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभव झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर पक्षानं संधी दिली नव्हती. त्यामुळं त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. याशिवाय काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. त्यावर बोलताना जानकर म्हणाले की, पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, त्यांच्या वडिलांचं संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेलंय. ऊन-पाऊस सर्वच पक्षांमध्ये असतो. असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या बातम्यांचं खंडन केलं आहे.

गणेशोत्सवानिमित्त रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहोत, त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं. आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन तशी मागणी केली आहे. आम्हाला मंत्रीपद द्यायचं की नाही किंवा मित्रपक्षांना सोबत घ्यायचं की नाही, हे भाजपनं ठरवावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचं केलं कौतुक...

राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार हे विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात चांगली कामं होत असून राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे.

पुढील बातम्या