मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde: मी आर्थिकदृष्ट्या तणावात, दररोज बँकांच्या पाया पडतेय; पंकजा मुंडे अडचणीत!

Pankaja Munde: मी आर्थिकदृष्ट्या तणावात, दररोज बँकांच्या पाया पडतेय; पंकजा मुंडे अडचणीत!

Sep 26, 2023, 08:31 PM IST

    • Vaidyanath Cooperative Sugar Factory: परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.
Pankaja Munde (HT_PRINT)

Vaidyanath Cooperative Sugar Factory: परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

    • Vaidyanath Cooperative Sugar Factory: परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

Pankaja Munde News: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या इतर कारखान्यांना सरकारकडून मदत मिळत आहे. परंतु, माझ्या कारखान्याकडे सरकारने दुर्लक्ष केले, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कागदपत्रे तपासली असता कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याले स्पष्ट झाले. यावर पंकजा मुंडेंनी भाष्य केले आहे. मी आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात असून दररोज बँकांच्या पाया पडतेय, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपली व्यथा मांडली आहे.

टीव्ही९ मराठी शी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “जीएसटी विभागाने काही महिन्यांपूर्वी परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी मी त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. तसेच माझी माणसं पाठवून कार्यालय उघडले. संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे दिली. अधिकाऱ्यांना ज्या आकड्यांबाबत शंका होती. त्यामध्ये काहीही तफावत आढळली नाही.”

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. मी देखील आर्थिकदृष्या प्रचंड तणावात आहे. माझे नऊ किलो वजन कमी झाले आहे. मी दररोज बँकेच्या पाया पडतेय. मात्र, ज्यावेळी इतर कारखान्यावर आर्थिक संकट कोसळले, तेव्हा सरकारकडून त्यांना मदत मिळाली. माझ्याही कारखान्याकडून मदतीसाठी अर्ज केला होता. पण आम्हाला मदत मिळाली नाही. मी तक्रार करत नाही. पण कदाचित मदत मिळाली असती तर, मी या पैशांची परतफेड करू शकली असते”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या