मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का! ‘वैद्यनाथ’ची १९ कोटींची मालमत्ता जप्त

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का! ‘वैद्यनाथ’ची १९ कोटींची मालमत्ता जप्त

Sep 24, 2023, 08:40 PM IST

  • vaidyanath sugar cooperative factory : पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या  परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे.

Pankaja munde

vaidyanath sugar cooperative factory : पंकजा मुंडेचेअरमन असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाईकेली आहे.

  • vaidyanath sugar cooperative factory : पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या  परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडेचे अरमन असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जीएसटी आयुक्तालयाने जप्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल; पाहून अंगावर काटा येईल

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने ६ महिन्यांपूर्वी धाड टाकून परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. यामध्ये या कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर चुकवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्यावर कारवाई करत तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

औरंगाबाद येथील केंद्रीय जीएसटी आयोगाच्या आयुक्त कार्यालयाकडून वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत वारंवार नोटीसा बजावण्यात आल्याहोत्या. या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी आयोगाने कारखान्यावर धाड टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती. या कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले.

 

त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या