मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde: 'दारू प्यायची तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका...'; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Pankaja Munde: 'दारू प्यायची तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका...'; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Dec 12, 2023, 08:00 PM IST

  • Pankaja Munde on liquor : दारू प्यायची असेल तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका, त्याने विषबाधा होते, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Pankaja Munde

Pankaja Munde on liquor : दारू प्यायची असेल तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका, त्याने विषबाधा होते, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

  • Pankaja Munde on liquor : दारू प्यायची असेल तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका, त्याने विषबाधा होते, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

दारू प्यायची असेल प्या त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही, मात्रहातभट्टीची पिऊ नका,त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही",असाअजबसल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडेया सल्ल्याने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंतीनिमित्त परळीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनीहा सल्ला दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात पंकजा मुंडेयांनी रक्तदान केले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना मुंडे म्हणाल्या की,दारू प्यायची असेल तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका. त्याने विष बाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा, पुड्या तंबाखूखाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू-पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसं दिसते ते. यापुढे तंबाखू-पुड्या खाऊ नका. तसेच चांगलं चांगलं खा. मांस-मच्छी, भाज्या खा आणि निरोगी रहा, असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

माझा एचबी१४आहे मी हेल्दी आहे. मला वेळेवर कोणी जेवायला देत नाही तरीसुद्धा मी हेल्दी आहे. पंकजा मुंडे आपल्या विविध वक्तव्यांनी आणि कार्यकर्त्यांमधील संवादाने बऱ्याचवेळा चर्चेत येतात.आताही या सल्ल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

 

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेब १०० वर्षे जगावे अशी सर्वांची इच्छी होती, मात्र ते जगू शकले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबर रोजी दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे, असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आज केले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या