मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur : सोन्याचं बाशिंग अन् विठ्ठल-रखुमाईचं लागलं लगीन.. अक्षतासाठी भाविकांची अलोट गर्दी

Pandharpur : सोन्याचं बाशिंग अन् विठ्ठल-रखुमाईचं लागलं लगीन.. अक्षतासाठी भाविकांची अलोट गर्दी

Jan 26, 2023, 06:19 PM IST

  • Pandharpur vitthal Rukmini wedding : वसंतपंचमी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साही वातावरण पार पडला. वसंतपंचमी व प्रजासत्ताकदिन एकाच दिवशी आल्याने मंदिरात भाविकाची मोठी गर्दी होती.

विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा

Pandharpur vitthal Rukmini wedding : वसंतपंचमी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साही वातावरण पार पडला. वसंतपंचमी व प्रजासत्ताकदिन एकाच दिवशी आल्याने मंदिरात भाविकाची मोठी गर्दी होती.

  • Pandharpur vitthal Rukmini wedding : वसंतपंचमी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साही वातावरण पार पडला. वसंतपंचमी व प्रजासत्ताकदिन एकाच दिवशी आल्याने मंदिरात भाविकाची मोठी गर्दी होती.

पुंढरपूर -  विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गुरुवारी दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी पार पडला. 'या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागलं....' या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन व विवाह सोहळा एकत्रित आल्याने अवघी पंढरी गजबजली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधान पोर्शे कारने दोघांना चिरडले, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मंगळवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची लगीनघाई सुरू होती. विठ्ठल मंदिरातील सभामंडपात भव्य मंच सजविला होता आणि त्याला आकर्षक फुलांची सजावट केली होती. प्रजासत्ताक दिन असल्याने तिरंगा आरास साकारण्यात आली होती. तसेच विठ्ठल, रखूमाईचा गाभारा विविध प्रकारच्या रंगीत, सुगंधीत फुलांनी लग्नघरासारखा सजविला होता. एरवी टाळ-मृदंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणाऱ्या मंदिरात मंगळवारी मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वन्हाडी मंडळी यांची लगबग सुरू होती. बाहेर सोन्याचे वाशिंग बांधून देवाचे लग्न लावण्यासाठी शेकडो वन्हाडी उपस्थित होती.

गुलाल रुक्मिणीमातेच्या गाभान्यातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेला आणि तिथे गुलालाची उधळण केली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेऊन तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती सभामंडपात विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली.

हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण मंदिर आणि गाभारा झेंडू, शेवंती,  गुलाब,  निशिगंध,  एथोरियम, ऑरकेड, कामिनी, तगर,  अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा, ड्रेसेना,  तुळशी, इतर प्रकारच्या आकर्षक फुलांनी सजविला होता. विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र, मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले. विठ्ठलासही पांढऱ्या शुभ्र वस्त्राने व सुवर्णालंकारांनी सजविले होते. 

यावेळी दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधल्या, अंतरपाट धरला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत विवाह लावण्यात आला. उपस्थित वन्हाडी मंडळींना अक्षता वाटप केल्यानंतर मंगलाष्टका झाल्या. कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मंगलाष्टके म्हटली. उपस्थित वन्हाडी मंडळींनी विवाह झाल्यानंतर आनंदाच्या भरात मंडपात सुरु असलेल्या या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं, या गाण्यावर ठेका धरला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या