मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  bacchu kadu : ‘या’ प्रकरणात आमदार बच्चू कडू यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा

bacchu kadu : ‘या’ प्रकरणात आमदार बच्चू कडू यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा

Feb 27, 2023, 08:33 PM IST

  • mla bacchu kadu : प्रहार संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना २०१५ मधील एका प्रकरणात दोषी ठरवत धाराशीव न्यायालयाने त्यांना दिवसभर वसून राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू

mla bacchu kadu : प्रहार संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना २०१५ मधील एका प्रकरणात दोषी ठरवत धाराशीव न्यायालयाने त्यांना दिवसभर वसून राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

  • mla bacchu kadu : प्रहार संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना २०१५ मधील एका प्रकरणात दोषी ठरवत धाराशीव न्यायालयाने त्यांना दिवसभर वसून राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

प्रहार संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना धाराशीव न्यायालयाने विचित्र शिक्षा सुनावली आहे. कोर्टाचे दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत त्यांना एकाच जाही बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली. सन २०१५ मधील एका प्रकरणाच्या खटल्यात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बच्चू कडू व इतर तीन जणांच्या विरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

या प्रकरणाची आज धाराशीव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी कलम ५०६  नुसार बच्चू कडू यांना दोषी धरत कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसून राहणे व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील इतर तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये धाराशीव जिल्हा परिषदेत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचा अपंग निधी खर्च न केल्याने प्रहार संघटनेने बच्चू कडूंच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह मयूर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत जाधव आदि पाच जण आरोपी होते. यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. 

पुढील बातम्या