मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला अटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला अटक

Mar 06, 2024, 08:26 AM IST

  • Offensive Posts Against Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.

Jail

Offensive Posts Against Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.

  • Offensive Posts Against Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरूण बीड येथील रहिवाशी आहे. हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.

आरोपी तरूणाविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ (धर्म, वंश, जन्मस्थळाच्या आधारे विविध गटांमध्ये वैर निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉ भीमराव आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला कोर्टाने ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या