मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur winter session : लोकसभेतील घुसखोरीचा धसका; राज्य विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास बंद

Nagpur winter session : लोकसभेतील घुसखोरीचा धसका; राज्य विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास बंद

Dec 13, 2023, 03:56 PM IST

  • Maharashtra Assembly Winter Session : लोकसभेत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा व विधान परिषदेतील प्रेक्षक गॅलरीचे पास बंद करण्यात आले आहेत.

Nagpur Vidhan Bhavan

Maharashtra Assembly Winter Session : लोकसभेत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा व विधान परिषदेतील प्रेक्षक गॅलरीचे पास बंद करण्यात आले आहेत.

  • Maharashtra Assembly Winter Session : लोकसभेत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा व विधान परिषदेतील प्रेक्षक गॅलरीचे पास बंद करण्यात आले आहेत.

Maharashtra Assembly Winter Session : सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळं लोकसभेत आज घडलेल्या प्रकारातून धडा घेत राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या प्रेक्षक गॅलरीत प्रवेशासाठी देण्यात येणार पास तूर्त बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

लोकसभेत कामकाज सुरू असताना आज अचानक दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. नंतर सभागृहातील मोकळ्या बाकांवरून ते इकडं-तिकडं पळू लागले. त्यांनी पिवळ्या रंगाचा धूरही सोडला. त्यामुळं एकच खळबळ उडाली. खासदारही घाबरले. काही वेळातच या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, यामुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संसद भवनावरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असतानाच हा प्रकार घडल्यानं तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

lok sabha news : राजधानी दिल्लीत खळबळ; दोन व्यक्ती लोकसभेत घुसल्या, पिवळा धूर सोडला, पाहा Video

या सगळ्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.    

आमदारांना फक्त दोन पास मिळणार

लोकसभेतील धक्कादायक घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी तात्काळ विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली. आमदारांना मिळणाऱ्या अतिरिक्त पासवर अनेकदा काही लोक विधिमंडळाचं कामकाज बघण्यासाठी येत असतात. मात्र, आता विधानसभेच्या आमदारांना फक्त दोन पास देण्यात येतील, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या