मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Center Railway : मध्य रेल्वे मार्गावर खडवली ते टिटवाळा दरम्यान उद्यापासून चार दिवस रात्रकालीन ब्लॉक

Center Railway : मध्य रेल्वे मार्गावर खडवली ते टिटवाळा दरम्यान उद्यापासून चार दिवस रात्रकालीन ब्लॉक

Dec 19, 2023, 09:08 PM IST

  • Central Railway Night Block : टिटवाळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून त्यासाठी बुधवार ते रविवार चार दिवस रात्रकालीन वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

Central Railway Night Block : टिटवाळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून त्यासाठी बुधवार ते रविवार चार दिवस रात्रकालीन वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Central Railway Night Block : टिटवाळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून त्यासाठी बुधवार ते रविवार चार दिवस रात्रकालीन वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

टिटवाळ्याजवळील ४ लेन रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे खडवली आणि टिटवाळा दरम्यान विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ते रविवारपर्यत रात्री १२ ते २ वाजेपर्यंत दोन तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

Weather Update: मुंबईत ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता; पुणे, संभाजीनगर, सांगली , नगरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले

खडवली आणि टिटवाळा दरम्यान टिटवाळा स्टेशनच्या ६४/३०-३१ किलोमीटरवर ४५.४ मीटर लांबीच्या ४ लेन रोड ओव्हर ब्रिज गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी: ००.०० ते ०२.०० (२ तास) असणार आहे. बुधवारच्या मध्यरात्रीपासून रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत चार दिवस २-२ तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

खडवली ते टिटवाळा दरम्यान अप लाईन्स प्लॅटफॉर्मसह क्रॉस ओव्हर्स आणि रिव्हर्सल प्लॅटफॉर्म वगळून हा ब्लॉक असेल. 

ब्ल़ॉक कालावधीतील वाहतूक सेवा -

 • टिटवाळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंच धावेल.

 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी टिटवाळा येथून ०३.५६ वाजता सुटणारी लोकल ठाणे येथून सुटेल.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या धावण्यावर या ब्लॉकचा परिणाम होणार नाही.

पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

पुढील बातम्या