मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचा ४२ किलोमीटरचा भाग गणेशोत्सवापूर्वी खुला करणार

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचा ४२ किलोमीटरचा भाग गणेशोत्सवापूर्वी खुला करणार

Sep 05, 2023, 10:38 AM IST

  • Mumbai Goa Highway : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास सुखकर आणि लवकर व्हावा या साठी मुंबई गोवा मार्गाच्या ४२ किलोमीटरचा भाग खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे उद्दिष्ट आहे.

Mumbai goa highway (file pic)

Mumbai Goa Highway : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास सुखकर आणि लवकर व्हावा या साठी मुंबई गोवा मार्गाच्या ४२ किलोमीटरचा भाग खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे उद्दिष्ट आहे.

  • Mumbai Goa Highway : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास सुखकर आणि लवकर व्हावा या साठी मुंबई गोवा मार्गाच्या ४२ किलोमीटरचा भाग खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे उद्दिष्ट आहे.

मुंबई : गणपतीसाठी कोकणात जणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास सुखकर आणि लवकर व्हावा या साठी मुंबई गोवा मार्गाच्या ४२ किलोमीटरचा भाग खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसांत पनवेल ते रायगड जिल्ह्यातील कासूपर्यंतची एका बाजूची लेन लवकरच खुली केली जणार आहे. सध्या बिटुमिनस रस्त्याचे सिमेंटीकरनाचे काम सुरू असल्याचे NHAI अधिकाऱ्याने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune Jawan martyred : शत्रूच्या हल्ल्यात पुण्यातील जवान शहीद; आज होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई आणि गोवा यांना जोडण्यासाठी ५५५ किमी लांबीचा महामार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्याच्या ४६० किमी काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत करण्यात येणार आहे. NHAI रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर हा ८४ किमीचा महामार्ग बांधत आहे. दोन टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल ते कासू पर्यंतच्या ४२ किमी लांबीचे काम केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कासू ते इंदापूर पर्यंतच्या उर्वरित ४२ किमी लांबीच्या मार्गाचे काम केले जाणार आहे.

Dr. Pradip Kurulkar: कुरुलकरने दिलेली माहिती गोपनीय नाही; सुनावणी बंद खोलीत घेण्यास विरोध

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी लवकरच पनवेल ते कासू पर्यंतची लेन सुरू केला जाणार आहे. या कामाचे JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला ऑर्डर दिली गेली आहे. तब्बल १५१ कोटी रुपये या कामास्तही देनेत आले आहे. तर कल्याण टोल इन्फ्राला नोव्हेंबर २०२२ मध्ये टप्पा दोनचे काम देण्यात आले आहे.

NHAI अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला सुप्रीम टोलवेज प्रायव्हेट लिमिटेडला २०११ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण ८४ किमी (पनवेल ते इंदापूर) बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले होती. हे काम २०१४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजण होते. मात्र, भूसंपादनाच्या अडचणी दूर करून देखील आर्थिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. या कामासाठी कंत्राटदाराला ५५० कोटी रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात आली आहे. टप्पा क्रमांक एक मधील पनवेल ते कासू या ४२ किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर टप्पा २च्या नियोजित रस्त्याच्या केवळ २० किमी हे काम पूर्ण झाल्याने रद्द करून हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले होते.

दुसऱ्या कंत्राटदाराने पनवेल ते कासू या ४२ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले असले तरी, या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४२ किमीच्या पनवेल ते कासू या मार्गाच्या ३२ किमी पट्ट्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. हे काम गणपती पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या