मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. नवविवाहिता पतीला भीती दाखवायला गेली अन् जीव गमावून बसली, परभणीतील घटना

धक्कादायक.. नवविवाहिता पतीला भीती दाखवायला गेली अन् जीव गमावून बसली, परभणीतील घटना

Sep 23, 2023, 08:24 PM IST

  • Parbhani news : नवऱ्याला भीती घालण्यासाठी गळफास घेण्याचे नाकट करताना खराच फास लागला व त्यात नवविवाहितेला जीव गमवावा लागला. ही घटना परभणी जिल्ह्यतील जिंतूर तालुक्यात घडली आहे.

इनसेटमध्ये मृत सायली

Parbhani news : नवऱ्याला भीती घालण्यासाठी गळफास घेण्याचे नाकट करताना खराच फास लागला व त्यात नवविवाहितेला जीव गमवावा लागला. ही घटना परभणी जिल्ह्यतील जिंतूर तालुक्यात घडली आहे.

  • Parbhani news : नवऱ्याला भीती घालण्यासाठी गळफास घेण्याचे नाकट करताना खराच फास लागला व त्यात नवविवाहितेला जीव गमवावा लागला. ही घटना परभणी जिल्ह्यतील जिंतूर तालुक्यात घडली आहे.

परभणी जिल्ह्यातून एक खळबळनजक घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेला पतीला भीती घालणे चांगलेच अंगलट आले आहे. नवऱ्याला भीती दाखवण्याच्या उद्देशाने गळफास लावून घेण्याचे नाटक करतानाच खराच गळफास लागला व त्यातच तिचामृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील कावी येथेही घटना घडली आहे. याप्रकरणीअकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

सायली लक्ष्मण काठमोरे (वय १९) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. कावी गावातील लक्ष्मण रामभाऊ काठमोरे व त्यांची पत्नी सायली हे नवविवाहित जोडपे पुणे येथे कामानिमित्ताने रहात होते. सणासाठी तेगावाकडे आले होते.

२१सप्टेंबर रोजी सायंकाळी महालक्ष्मी मांडणे झाल्यानंतर सायलीला लक्ष्मण यांनी गणपती दर्शनासाठी जातो असे म्हटले. तेव्हा सायलीने गमतीने म्हटले की, जर तुम्ही गणपती बघायला गेलात तर मी घरात फाशी घेईल. लक्ष्मण यांनीही गंमत म्हणून हसत हसत घे फाशी असे म्हणत निघून गेले.

त्यानंतर सायलीने पती लक्ष्मणला भीती घालण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मी मांडणीसमोरच दोरीचा फास करून गळ्यात अडकविला, मात्र पायाखालील स्टूल निसटल्याने तिचा त्यातच प्राण गेला. हा प्रकार सायलीच्या मृत्यूनंतरच कुटुंबियांना समजला. तिची प्राणज्योत मावळल्याने एका नवविवाहित जोडप्याचा संसार अर्ध्यावरच मोडला आहे. या घटनेमुळे काठमोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

घटनास्थळी बामणी पोलीसठाण्याचे पथक पोहोचून घटनेचा पंचनामा केला व मृतसायलीचे शविच्छेदन जिंतूर येथील शासकीयरुग्णालयात केले.सायलीच्या आई-वडिलांनीकोणावरही आरोप न केल्यामुळेअकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या