मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Temple Dress Code : श्रावणाच्या पहिल्याच आठवड्यात ड्रेसकोडची सक्ती, कुणकेश्वर मंदिरात नियम मोडल्यास...

Temple Dress Code : श्रावणाच्या पहिल्याच आठवड्यात ड्रेसकोडची सक्ती, कुणकेश्वर मंदिरात नियम मोडल्यास...

Aug 22, 2023, 03:59 PM IST

    • Temple Dress Code : श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच कुणकेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोडची सक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Kunkeshwar Mandir Dress Code (HT)

Temple Dress Code : श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच कुणकेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोडची सक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    • Temple Dress Code : श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच कुणकेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोडची सक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Kunkeshwar Mandir Dress Code : श्रावण महिना सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात येणार असून त्यासाठीची एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणातील भोलेनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नव्या ड्रेसकोडचं पालन करावं लागणार आहे. भारतीय संस्कृती व परंपरांची जपणूक आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी कुणकेश्वर मंदिरात नव्या ड्रेसकोडची घोषणा करण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय नव्या नियमांचं पालन न करणाऱ्या भाविकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

कोकणातील कुणकेश्वर मंदिरात तोकडे, फाटलेले, अंगप्रदर्शन करणारे किंवा अर्धवट अंग दिसणारे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना शाल, उपरणे, पंचा किंवा ओढणी भेट म्हणून देण्यात येणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय मंदिर प्रशासनाने जारी केलेल्या नव्या नियमांचं पालन न करणाऱ्या भाविकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आता कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अंगभर कपडे घालावे लागणार आहे. महिलांसह पुरुषांनाही नवे नियम लागू असणार आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठड्यात लागू करण्यात आलेली नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन कुणकेश्वर देवस्थानकडून करण्यात आलं आहे. दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं आता मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना नव्या ड्रेसकोडचं पालन करावं लागणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या