मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Covid News : महाराष्ट्रात आढळले कोविडच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Covid News : महाराष्ट्रात आढळले कोविडच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Aug 09, 2023, 07:09 PM IST

  • Eris Covid Variant : कोविडच्या नव्या एरिस या अवतारानं आता मुंबई, महाराष्ट्रासह भारताची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले आहेत.

New Covid Variant Eris

Eris Covid Variant : कोविडच्या नव्या एरिस या अवतारानं आता मुंबई, महाराष्ट्रासह भारताची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले आहेत.

  • Eris Covid Variant : कोविडच्या नव्या एरिस या अवतारानं आता मुंबई, महाराष्ट्रासह भारताची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले आहेत.

Eris Covid Variant : दोन-अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोविड विषाणू निष्प्रभ झाल्याचं वाटत असतानाच त्याचे वेगवेगळे व्हेरिएंट डोकं वर काढत आहेत. एरिस हा नवा व्हेरिएंट सध्या सक्रिय झाला असून ब्रिटनमध्ये याची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटची लागण झालेले काही रुग्ण आढळल्यामुळं चिंता वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत २ महिलांसह ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभरात वादळी वारे अन् अवकाळीचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

कोविडचा हा नवा विषाणू भारतात मे महिन्यातच आढळला होता, मात्र त्यानंतरच्या जून आणि जुलै महिन्यांत त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. जुलै अखेरपासून पुन्हा कोरोना बाधितांमध्ये वाढ झाली आहे, असं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढं आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

कोविडच्या काळात आरोग्याविषयी सर्वसामान्यांमध्ये आलेली सतर्कता आता कमी झाली आहे. लोक पुन्हा पूर्वीसारखेच वावरू लागले आहेत. त्यामुळं रोगप्रतिकारक क्षमता घटलेली असू शकते. अशा वेळी योग्य सावधगिरी न बाळगल्यास मोठा फटका बसू शकतो, अशी भीती फरिदाबादच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी शेखर झा यांनी व्यक्त केली आहे.

एरिस व्हेरिएंटची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली होती. त्यानंतर मुंबईत काही प्रकरणांची नोंद झाली. मात्र, त्यात वाढ झाली नाही. त्यामुळं भारताला फार चिंता करण्याची गरज वाटत नाही, असं मत गुरगावच्या सीके बिर्ला हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर व पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ कुलदीप कुमार ग्रोव्हर यांनी मांडलं.

एरिसची लक्षणे

एरिस व्हेरिएंट बाधितामध्ये ओमिक्रॉन रुग्णांसारखीच लक्षणं दिसतात. खोकला, सर्दी, ताप, घसा दुखणे आणि छाती भरून येणे असा त्रास रुग्णाला होतो. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या आणि काही हळव्या लोकांसाठी हा प्राणघातक ठरू शकतो. याआधीच्या व्हेरिएंटपेक्षा हा अधिक संसर्गजन्य असल्याचं दिसतं, असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.

संसर्ग टाळण्यासाठी काय करावं?

समतोल आहार, स्वच्छतापूर्ण जीवनशैली, नियमित लसीकरण (लागू असल्यास किंवा फ्लू शॉट्स) या तीन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोविड काळात घ्यावायची खबरदारी देखील इथं महत्त्वाची आहे. त्यात मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे आणि निर्जंतुकीकरण करत राहणे ही काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे, असं डॉ. ग्रोव्हर यांनी सांगितलं.

WHO सतर्क

संसर्गाचा वेग, संसर्गाची तीव्रता, लसीकरण आणि उपचारांची परिणामकारकता अशा विविध घटकांवर करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फटका किती बसणार हे अवलंबून आहे. व्हायरस हे ठराविक कालावधीनं स्वरूप बदलत असल्यानं नवा व्हेरिएंट जन्माला शक्यता नेहमीच राहणार आहे. एरिस किंवा EG5.1 हा असाच एक व्हेरिएंट असून जागतिक आरोग्य संघटना या व्हेरिएंटचा संसर्ग व संभाव्या परिणामांवर लक्ष ठेवून आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या