मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar: "भाजपचे रोजगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन, मात्र बारामती पवारमुक्त करण्याचे लक्ष्य"

Rohit Pawar: "भाजपचे रोजगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन, मात्र बारामती पवारमुक्त करण्याचे लक्ष्य"

Sep 09, 2022, 04:10 PM IST

    • भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला.
बारामती पवारमुक्त करण्याचे भाजपचे लक्ष्य

भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला.

    • भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला.

 Ncp rohit pawar criticize bjp : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवून मिशन महाराष्ट्र सुरू केले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपच्या नेत्यांकडून शरद पवार व कुटुंबावर निशाणा साधला जात आहे. याला राष्ट्रवादी नेत्यांकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे. अजित पवारांनी भाजपला कानपिचक्या दिल्यानंतर पवार कुंटूबातील सदस्य आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला टोला लगावला आहे. रोहित पवारांनी म्हटले की, भाजपचे एकमेव लक्ष्य आहे ते म्हणते बारामती पवारमुक्त तर मुंबई ठाकरे मुक्त करणे. मात्र त्यांनी रोजगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन बाळगले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मिशन इंडिया व मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना इशारा दिला होता. तर, पंतप्रधान मोदी हे मोठे नेते आहेत. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. शरद पवारांनी नादी लागू नये, या शब्दांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवत ज्या पक्षाने ज्यांचे व पत्नीचे तिकीट कापले त्यांने बाता मारू नयेत. असे म्हटले. 

अजित पवारांनंतर रोहित पवारांनीही भाजप विरोधात शड्डू ठोकला आहे. आताच्या घडीला बारामती पवारमुक्त करायची. मुंबई ठाकरेमुक्त करायची, या दोन मुद्यांवर भाजपचे राजकारण सुरू आहे. मात्र  सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजप नेत्यांचे सोयीस्कर मौन आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या बातम्या होणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करत आहेत. असा टोला रोहित पवार यांनी बावनकुळेंना लगावला. 

रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे, असा चिमटाही रोहित पवार यांनी काढला.

पुढील बातम्या