मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Independence Day : 'सध्याची परिस्थिती बघता देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का?'

Independence Day : 'सध्याची परिस्थिती बघता देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का?'

Aug 15, 2023, 05:19 PM IST

  • Jitendra Awhad on true freedom : देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

Jitendra Awhad slams Narendra Modi govt

Jitendra Awhad on true freedom : देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

  • Jitendra Awhad on true freedom : देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

Jitendra Awhad on Independence Day : 'अनेकांनी बलिदान दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालंय. मात्र, देशात आणि महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, ती पाहाता खरंच स्वतंत्र उरलं आहे का? असा प्रश्न जनतेला आज स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करताना पडला आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

'मणिपूर अक्षरश: पेटवलं गेलं, त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला, मात्र तिथलं सरकार आणि केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही अशाच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात द्वेषाचं राजकारण इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की माणुसकी उरणार की नाही असा प्रश्न पडला आहे. लोकशाहीवर सध्या सर्वात मोठा हल्ला होतोय. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला आपली लोकशाही टिकवावी लागेल, असं आवाहन आव्हाड यांनी केलं.

मोदींना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखलं पाहिजे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाचा उल्लेखही आव्हाड यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास बोलून दाखवला आहे, पण लोकशाही टिकवायची असेल तर त्यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखलं पाहिजे, असं आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला, त्यावेळी सह्याद्री मदतीसाठी धावून गेला. शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या तळागाळात रुजलेला आहे. राज्यातील जनता शरद पवारांच्या पाठीशी आहे. लोकशाहीच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे, असं ते म्हणाले.

ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई व्हावी!

ठाण्यातील कळवा इथल्या जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २७ रुग्ण दगावले आहेत. मात्र राज्य सरकारनं अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. रुग्णालयातील बेजबाबदार व्यक्तींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे. मुख्यमंत्री स्वत: ठाणेकर आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीनं कारवाई करावी, अशी माझी एक ठाणेकर म्हणून मागणी आहे, असं आव्हाड म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या