मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BJP vs NCP : निलेश राणेंच्या कानाखाली हाणा अन् लाखभर मिळवा, राष्ट्रवादीची नवी ऑफर

BJP vs NCP : निलेश राणेंच्या कानाखाली हाणा अन् लाखभर मिळवा, राष्ट्रवादीची नवी ऑफर

Jun 09, 2023, 08:25 AM IST

    • Nilesh Rane Statement : भाजपा नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीने थेट भूमिका घेतली आहे.
Nilesh Rane Statement On Sharad Pawar (HT)

Nilesh Rane Statement : भाजपा नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीने थेट भूमिका घेतली आहे.

    • Nilesh Rane Statement : भाजपा नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीने थेट भूमिका घेतली आहे.

Nilesh Rane Statement On Sharad Pawar : कोल्हापुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निलेश राणे यांनी पवारांची तुलना थेट औरंगजेबाशी करत नव्या औरंगजेबाचा पुनर्जन्म झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहे. निलेश राणे यांच्या कानशिलात लगावऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी मोठी ऑफर जारी केली आहे. त्यामुळं आता यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा गुजर यांनी निलेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय वायफळ बडबड करणाऱ्या निलेश राणे यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याचंही बाबा गुजर यांनी म्हटलं आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार होत असताना शांतता राखण्याची जबाबदारी राजकारण्यांची असते. परंतु निलेश राणे हे आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. हिंसाचारावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर वादग्रस्त वक्तव्य करणार असाल तर हे सहन केलं जाणार नसल्याचं सांगत बाबा गुजर यांनी निलेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

कोल्हापुरात हिंसाचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते की, कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला म्हणून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाहीय. सत्ताधारी नेते हिंसाचाराच्या घटनेला प्रोत्साहन देत आहे. कायदा व सुव्यस्था राखण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आहे, परंतु त्यांचेच नेते रस्त्यावर येत असल्याचं दिसून येत आहे. ही घटना योग्य नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.

पुढील बातम्या