मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sameer Wankhede: समीर वानखेडेंना क्लीन चिट; मलिक यांचे आरोप जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं फेटाळले

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना क्लीन चिट; मलिक यांचे आरोप जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं फेटाळले

Aug 13, 2022, 12:34 PM IST

    • Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वानखेडेंचं अनुसूचित जातीतील जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिला आहे.
NCB Officer Sameer Wankhede VS Nawab Malik (HT)

Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वानखेडेंचं अनुसूचित जातीतील जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिला आहे.

    • Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वानखेडेंचं अनुसूचित जातीतील जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिला आहे.

NCB Officer Sameer Wankhede VS Nawab Malik : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी आणि नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांमुळं चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता मुंबईतील जात प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या समितीनं वानखेडे यांनी यूपीएससीला सादर केलेलं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना मोठा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse: मुंबईनंतर पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळलं, गाड्यांचे मोठे नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Pune weather update : मुंबईत उकाड्याने तर, ऊन आणि पावसाच्या खेळानं पुणेकर हैराण

आर्यन खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते, त्यात वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारवर नोकरी मिळवण्याचा आरोप मलिकांनी केला होता. जात पडताळणी समितीनं वानखेडेंचं प्रमाणपत्र वैध ठरवल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

समीर वानखेडे आणि नवाब मलिकांमधील वाद काय होता?

समीर वानखेडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी नवाब मलिकांच्या जावयाला अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी त्यांची न्यायालयानं सुटका केली, त्यानंतर काही दिवसांतच कार्डिलिया क्रूझ केसमध्ये वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लाटल्याचा आरोप मलिकांनी केला होता. याशिवाय त्यांचं लग्नही मुस्लिम रितीनंच झाल्याचे काही पुरावेही मलिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात मोठा संघर्ष पेटला होता. या आरोपानंतर भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीनं मुंबई शहर जिल्हा जात पडताळणी समितीकडं वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता जात पडताळणी समितीनं हा निर्णय दिला आहे.

समीर वानखेडेंना क्लिनचिट...

समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सुनावणी करताना ते जन्मानं मुस्लिम नसल्याचा निर्वाळा जात पडताळणी समितीनं देत त्यांना क्लिनचिट दिली आहे. याशिवाय समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी धर्मांतर केलं नसल्याचंही समितीनं म्हटलं आहे. समीर वानखेडे हे अनुसूचित जातीतलेच असून त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं निरिक्षण समितीनं नोंदवलं आहे.

जात पडताळणी समितीनं दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका...

दरम्यान आता समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीनं दिलेल्या क्लिनचिटविरोधात अॅड. नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समीर वानखेडेंबाबत योग्य निर्णय देईल, अशी अपेक्षाच नव्हती, असं सातपुते यांनी म्हटलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या