मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राष्ट्रवादीत हालचालींना वेग, सुप्रिया सुळे व अजित पवार गटाच्या भेटीनंतर नवाब मलिकांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीत हालचालींना वेग, सुप्रिया सुळे व अजित पवार गटाच्या भेटीनंतर नवाब मलिकांचा मोठा निर्णय

Aug 15, 2023, 04:11 PM IST

  • Nawab malik : नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाला पाठिंबा देणार, ते अजित पवार गटात जाणार की शरद पवार यांना साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nawab malik

Nawab malik : नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाला पाठिंबा देणार, ते अजित पवारगटात जाणार कीशरद पवार यांना साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Nawab malik : नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाला पाठिंबा देणार, ते अजित पवार गटात जाणार की शरद पवार यांना साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेव माजी मंत्री नवाब मलिक यांची दीड वर्षानंतर तुरुंगातून जामीनावर मुक्तता झाली आहे. जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर नवाब मलिकांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णालयामध्ये नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. नवाब मलिक जामिनावर बाहेर येताच आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि रुपाली चाकणकर यांनी मलिक यांची भेट घेतली. काल शरद पवार गटाने व आज अजित पवार गटाच्या नेत्यांकडून मलिकांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. त्यामुळे नवाब मलिक कोणाच्या गटात सामील होणार याची उत्सुकता लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Pune weather update : मुंबईत उकाड्याने तर, ऊन आणि पावसाच्या खेळानं पुणेकर हैराण

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाला पाठिंबा देणार, ते अजित पवार गटात जाणार की शरद पवार यांना साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे नवाब मलिक सध्या कोणत्याही गटात सामील होणार नसून ते आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणारआहेत. राजकीय भूमिकेबाबत सध्या तरी मलिक कोणताही निर्णय घेणार नसल्याची माहिती मिळत आहे.

नवाब मलिकांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की,नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो होते. दीड वर्षानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. भेटीदरम्यान राजकीय विषयावर एक शब्दही चर्चा झाली नाही. कालच त्यांची सुटका झाली आहे, माणुसकी म्हणून आम्ही आमच्या मित्राला भेटायला आलो, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

 

सोमवारी सायंकाळच्या सुमारास जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मलिक यांना जेलमधून बाहेर आणण्यात आलं. वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जेलमधून बाहेर येताच नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक घरी निघाले. नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मलिक यांना जामीन देण्यात आला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या