मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अमरावती: आता ‘या’ नव्या प्रकरणात राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अमरावती: आता ‘या’ नव्या प्रकरणात राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

May 29, 2022, 04:59 PM IST

    • जवळपास दीड महिन्यांनी मतदारसंघात परतलेल्या राणा दाम्पत्यांचे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जवळपास दीड महिन्यांनी मतदारसंघात परतलेल्या राणा दाम्पत्यांचे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    • जवळपास दीड महिन्यांनी मतदारसंघात परतलेल्या राणा दाम्पत्यांचे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमरावती : मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट धरून मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांना राजद्रोहाच्या कलमाखाली अटक करून तुरुंगात टाकले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर हे दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर तब्बल ३६ दिवसांना  अमरावतीत परतताच या दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

जवळपास दीड महिन्यांनी मतदारसंघात परतलेल्या राणा दाम्पत्यांचे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा आणि हनुमानाची आरती सुरु होती. राज्यात रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर्सची परवानगी नाही. तरी देखील राणा समर्थकांनी लाऊड स्पीकर सुरु ठेवले होते. त्यामुळे आता अमरावती पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

अमरावती येथील शंकर नगर येथील राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण करण्यात आला. मध्यरात्री  १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून कार्यक्रम घेतला, त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात ३४१, १८८, १३४, १३५ कलम १५ पर्यावरण संवर्धन अधिनियम १९८६ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निश्चय राणा दाम्पत्याने केला होता. त्यावरून राणा दाम्पत्याला १४ दिवस मुंबईमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. या घटनेनंतर तब्बल ३६ दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी १०० किलोचा हार घातला होता. 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या