मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gunaratna Sadavarte : बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्याची मागणी

Gunaratna Sadavarte : बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्याची मागणी

Sep 29, 2023, 04:15 PM IST

  • Congress demands arrest of Gunaratna Sadavarte : महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

Gunaratna Sadavarte - Nathuram Godse

Congress demands arrest of Gunaratna Sadavarte : महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

  • Congress demands arrest of Gunaratna Sadavarte : महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

Gunaratna Sadavarte on Mahatma Gandhi : वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिका मांडून सातत्यानं लक्ष वेधून घेणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा अडचणीत आले आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसे याचा फोटो छापून त्याचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी सदावर्ते यांना बेड्या ठोकण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या निमित्तानं सदावर्ते यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. गोडसे हा महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर आहे. असं असलं तरी भाजपचं सरकार सत्तेवर आलं की गोडसेचं गुणगान केलं जातं. सदावर्ते नावाच्या विकृत इसमानं हेच केलं आहे. त्याला तात्काळ बेड्या ठोकण्याची हिंमत गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवावी, असं आव्हान लोंढे यांनी दिलं आहे.

'सदावर्ते हा व्यवसायानं वकील असलेला इसम सातत्यानं चिथावणीखोर वक्तव्य करतो. सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करतो. महात्मा गांधी यांच्याबद्दलही हा माणूस गरळ ओकत असतो. गोडसेचा फोटो स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर छापून त्यानं महात्मा गांधींचा अपमान केला आहे. गांधींचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही, असं म्हणत त्यानं नथुरामचं गुणगान गायलंय. याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं, तेव्हा तेव्हा नथुरामाच्या औलादी डोकं वर काढतात. राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा इशारा लोंढे यांनी दिला.

जगात भारताची ओळख गांधी नावानेच

जगात भारताची ओळख राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावानंच आहे. गांधींच्या नेतृत्वाखालीच भारतानं बलाढ्य ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडलं. अहिंसेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं हेच काही लोकांना व संघटनांना पचनी पडत नाही. महात्मा गांधींचा अपमान भाजप व त्याच्याशी संलग्न संस्था, संघटना व व्यक्ती करत असतात. अशा प्रवृत्तींना धडा शिकवणं गरजेचं आहे. सरकारनं याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी लोंढे यांनी केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या