मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “नारायण राणेंची नार्को टेस्ट केली, तर मशीनच बिघडून जाईल”, ठाकरे गटाने उडवली खिल्ली

“नारायण राणेंची नार्को टेस्ट केली, तर मशीनच बिघडून जाईल”, ठाकरे गटाने उडवली खिल्ली

Dec 23, 2022, 12:26 AM IST

  • Sanjana ghadi reply Nitesh rane : नितेश राणे यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना धाडी यांनी खोचक टोला लगावला आहे. 

नारायण राणे

Sanjana ghadi reply Nitesh rane : नितेश राणे यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना धाडी यांनी खोचक टोला लगावला आहे.

  • Sanjana ghadi reply Nitesh rane : नितेश राणे यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना धाडी यांनी खोचक टोला लगावला आहे. 

हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील AU नावावरुन हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाल्यानंतर दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झटत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर लोकसभेत आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रिया चक्रवर्तीला ‘AU’ या नावाने सेव्ह केलेल्या नंबरवरून ४४  फोन कॉल आले होते. ‘AU’ चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती लोकसभेत देत राहुल शेवाळेंनी चौकशीची मागणी केली होती.

राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपानंतर भाजप आमदार नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेत. आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली. नितेश राणे म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनचा विषय येतो, तेव्हा आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतो. अन्य कुणाचा का होत नाही. त्यामुळे दाल में कुछ काला है. जशी श्रद्धा वालकर प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली तसेच आदित्य ठाकरेची करा, म्हणजे सर्व समोर येईल. A फॉर अफताब आणि A र आदित्य. सगळ्या विकृतीचं नाव एकसमान झालं आहे,अशी टीका नितेश राणेंनी केली होती.

नितेश राणेंच्या या टीकेला आदित्य ठाकरेंनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नसले तरी शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजना घाडी म्हणाल्या, ‘नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांची आधी नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांच्या बायका का टिकत नव्हत्या? यांच्या घरातले टीव्ही का फुटत होते? सिंधुदुर्गातल्या घराघरात हे माहिती आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी भाजप तर कधी शिवसेनेला तुम्हा शिव्या घालता. याविषयावर बोलायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजना घाडी यांनीकेली आहे.

 

पुढील बातम्या