मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray On Nitin Gadkari : 'नितिन गडकरी जे करतात जे भव्य दिव्य, त्यामुळेच आम्ही...'; राज ठाकरे यांचे नागपुरात विधान

Raj Thackeray On Nitin Gadkari : 'नितिन गडकरी जे करतात जे भव्य दिव्य, त्यामुळेच आम्ही...'; राज ठाकरे यांचे नागपुरात विधान

Sep 18, 2022, 11:28 PM IST

    • Raj Thackeray on Vidarbha tour : राज ठाकरे सध्या पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. भर सभेत नगरपुरात नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. तसेच नितीन गडकरी यांनी देखील राज ठाकरे यांचे कौतुक केले.
undefined

Raj Thackeray on Vidarbha tour : राज ठाकरे सध्या पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. भर सभेत नगरपुरात नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. तसेच नितीन गडकरी यांनी देखील राज ठाकरे यांचे कौतुक केले.

    • Raj Thackeray on Vidarbha tour : राज ठाकरे सध्या पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली. भर सभेत नगरपुरात नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. तसेच नितीन गडकरी यांनी देखील राज ठाकरे यांचे कौतुक केले.

नागपूर : राज ठाकरे हे ५ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागपुरात आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल. डोघेही आज एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे तोंड भरुन कौतुक केले. राज ठाकरे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे काही करतात ते 'वरुन'च करतात, माझे आणि नितीन गडकरींचे विचार जुळतात कारण आमचे विचार भव्य-दिव्य आहेत. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

नितीन गडकरी आणि राज ठाकरे हे नागपूर येथील फुटाळा लेकवरच्या लेझर शोच्या कार्यक्रमाला एकत्र आले होते. या कार्यक्रमपूर्वी सकाळी भाजपच्या गडात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना प्रस्थापितांबरोबर लढण्यास सांगितले. त्या नंतर रात्री फुटाळा लेकवरच्या लेझर शो पाहिल्यानंतर त्यांनी गडकरी यांचे भरभरून कौतुक केले. राज ठाकरे म्हणाले, असे आजवर मी भारतात पाहिलेले नाही, असे जे काही पाहिले ते भारताच्या बाहेर पाहिले. नितीन गडकरी खाली काहीच करत नाहीत. उड्डाणपूल ही वर जातो, कारंजे ही वर जातात. आमचे दोघांचे विचार मिळण्याचे कारण म्हणजे आम्ही जे काही करतो भव्यदिव्य करतो. मी जे काही आज पाहिले ते अद्भुत आहे. हे फक्त नागपूरच्या लोकांसाठी नाही तर देशातील लोकांसाठी पाहण्यासारखी गोष्ट आहे, असे ठाकरे म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले, मला असं वाटतं नितीनजी तुम्ही नागपुरला येण्याचं अजून एक कारण ठेवलं. की नागपुरला का यावं ? नुसतं आता संत्रानगरीत स्वागत याच्या ऐवजी मला आता वाटतं कारंजानगरीत स्वागत असं बोलता येईल. कारण, आम्ही कारंजे भारतात पाहिलेच नाहीत, जे काय पाहिले ते बाथरुमध्येच. त्यामुळे जे काय मी आज पाहिलं ते अद्भूत आहे. फक्त नागपुरकरांसाठीच नाहीतर मला असं वाटतं देशातील लोक हा कार्यक्रम बघण्यासाठी नागपुरमध्ये येतील. ज्यावेळी देशातील लोक नागपुरात येतील त्यावेळी त्यासाठी म्हणून जी बांधणी नागपुरात लागेल, ती देखील होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा नितीन गडकरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. तर गडकरी म्हणले, राज ठाकरे हे कलावंत आहेत. ते उत्तम चित्रकार आहेत. राज ठाकरे आज नागपुरात आले तर मी त्यांना फाऊंटन पाहायला निमंत्रित केले. अजून काम पूर्ण झाले नाही, अजून व्यवस्था वाढवत आहोत. आणखी लोक बसू शकतील अशी व्यसस्था करणार आहे.

फुटाळा लवात आगामी काळात मोठं हॉटेल उभारणार असल्याचे पुढे गडकरी म्हणाले, या तलावात ८० हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये हॉटेल बनवणार आहे. हे हॉटेल तलावात असेल आणि त्यासाठी बोटीने हॉटेलपर्यंत जाण्याची सुविधा करण्यात येणार आहे. शिवाय तलावाच्या शेजारी जवळपास मोठे पार्किंग करण्यात येणार आहे. नागपुरात फुटाळा तलावामध्ये लोटस गार्डन बनवणार असेही गडकरी म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या