मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिंग्नल यंत्रणेत बिघाड पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिंग्नल यंत्रणेत बिघाड पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Aug 08, 2023, 11:59 AM IST

    • Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली. येथील गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत असल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यास उशिर होत आहे.
local train services disrupted (HT)

Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली. येथील गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत असल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यास उशिर होत आहे.

    • Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली. येथील गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत असल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यास उशिर होत आहे.

मुंबई : मुंबईत चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या या उशिरा धावत असून यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आज गैरसोय झाली. सकाळी ९.३० मिनिटांनी हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, तरी सुद्धा या मार्गावरील गाड्या या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Pune News : पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्यानं नवऱ्यानं मागितला घटस्फोट; कोर्टानं दिली मंजुरी

मुंबईकरांसाठी आजची सकाळ त्रासदायक ठरली. आज सकाळी कामगार, नौकरदार वर्ग आपल्या कामासाठी निघाले असता. सकाळच्या वेळेला चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या या मध्येच उभ्या होत्या. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यास प्रवाशांना विलंब झाला. रेल्वेचे कर्मचारी हा बिघाड शोधण्यात व्यस्त होते. दरम्यान, बिघाड कुठे झाल्याचे कळल्यावर रेल्वे अधिकारी अभियंत्रे आणि कामगार हे सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याच्या कामी लागले होते. दरम्यान, ९.३० मिनिटांनी येथील बिघाड दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.

Pune Terrorist arrest : पुण्यातील दहशतवाद्यांचे ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे तपासात उघड; प्रकरण ‘एनआयए’कडे

चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुसरुत केल्यावर देखील या मार्गावरील वाहतूक ही धीम्या गतीने पुढे जात होती. अनेक गाड्या या १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावत होत्या. सकाळची वेळ ही मुंबईकरांसाठी महत्वाची असते. अनेक कर्मचारी तसेच नौकरदार चाकरमानी हे या वेळेला बाहेर पडत असतात. या वेळी गाड्यांना गर्दी असते. तसेच इच्छितस्थळी जाण्याची अनेकांची लगबग असते. मात्र, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक नागरिक हे स्थानक तसेच लोकलमध्ये अडकून पडल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यास उशीर झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सिग्नल यंत्रणेत वारंवार बिघाड होतो आहे. याचा नाहक त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतोय. रेल्वे मार्गावरील बिघाड दुरुस्त करण्यासाठी अनेकदा मेगाब्लॉक घेतला जातो, असे असताना देखील काम व्यवस्थित होत नसल्याने सिग्नल यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने याचा फटका मात्र, प्रवाशांना बसत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या