मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Western Railway: प्रवाशांना स्वस्तात शुद्ध पाणी मिळणार; रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन लागणार

Western Railway: प्रवाशांना स्वस्तात शुद्ध पाणी मिळणार; रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन लागणार

Jul 12, 2023, 05:33 PM IST

  • Water vending machines on western Railway: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या २५ स्थानकांवर वेंडिंग वॉटर मशीन बसवण्याची योजना आखण्यात आली.

water vending machines

Water vending machines on western Railway: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या २५ स्थानकांवर वेंडिंग वॉटर मशीन बसवण्याची योजना आखण्यात आली.

  • Water vending machines on western Railway: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या २५ स्थानकांवर वेंडिंग वॉटर मशीन बसवण्याची योजना आखण्यात आली.

Water vending machines: रेल्वे स्थानकावर एक लीटर पिण्याच्या पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. प्रवाशांची अशाप्रकारे होणारी लूट थांबवण्यासाठी पश्चिम रेल्वेने नवी योजना आखली आहे. या योजनेंतर्गत पश्चिम रेल्वे मुंबईतील २५ रेल्वे स्थानकावर एकूण ५३ वॉटर वेंडिंग मशीन बसवणार आहे. यामुळे प्रवाशांना माफक दरात पिण्याचे पाणी खरेदी करता येणार आहे. प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा पश्चिम रेल्वेचा उद्देश आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

वॉटर वेंडिंग मशिन्स रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर प्युरीफिकेशन तंत्रज्ञानाने बनवण्यात आले. ज्यामुळे पाण्यातील जिवाणू नष्ट होतात आणि प्रवाशांना स्वच्छ पाणी प्यायला मिळते. एवढेच नव्हेतर, या यंत्रांमुळे प्रवाशांना माफक दरात पिण्याचे पाणी खरेदी करता येईल. प्रवाशांना स्थानकावर पाणी पिण्याचा तसेच बाटलीत पाणी भरून घेऊन जाण्याचा पर्याय असेल. ही सुविधा स्थानकांवर २४ तास उपलब्ध असेल.

वॉटर व्हेंडिंग मशिनची स्थापना आणि ऑपरेशनसाठीचा करार ५ वर्षांच्या कालावधीसाठी असेल. या मशीनमुळे रेल्वेला एका वर्षाला ३२.५६ लाख महसूल मिळेल. तर, एकूण ५ वर्षात १.६९ कोटी महसूल प्राप्त होईल. या वॉटर वेंडिंग मशीन येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत स्थापित केल्या जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे पीआरओ सुमीत ठाकूर यांनी दिली.

प्रवाशांना ३०० मि.ली. पाण्यासाठी दोन रुपये द्यावे लागतील. बॉटलसह खरेदी केल्यास ३ रुपये द्यावे लागतील. तसेच अर्धा लीटर पाण्यासाठी प्रवाशांकडून ३ रुपये आकरले जातील. बॉटलसह अर्धा लीटर पाण्याची किंमत ५ रुपये असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या