मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण; तरीही सागरी सुरक्षा ही अपुरिच

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण; तरीही सागरी सुरक्षा ही अपुरिच

Nov 26, 2023, 09:11 AM IST

    • 26/11 Mumbai Terror Attack 2008 : मुंबईसह संपूर्ण देशासाठी २६ नोव्हेंबेर २००८ हा काळा दिवस होता. पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करत तब्बल १६६ नागरिकांचा बळी घेतला होता. या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाले तरी आज देखील देशाच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न हा तेवढाच गंभीर आहे.
26/11 terrorist attack

26/11 Mumbai Terror Attack 2008 : मुंबईसह संपूर्ण देशासाठी २६ नोव्हेंबेर २००८ हा काळा दिवस होता. पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करत तब्बल १६६ नागरिकांचा बळी घेतला होता. या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाले तरी आज देखील देशाच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न हा तेवढाच गंभीर आहे.

    • 26/11 Mumbai Terror Attack 2008 : मुंबईसह संपूर्ण देशासाठी २६ नोव्हेंबेर २००८ हा काळा दिवस होता. पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करत तब्बल १६६ नागरिकांचा बळी घेतला होता. या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाले तरी आज देखील देशाच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न हा तेवढाच गंभीर आहे.

26/11 Mumbai Terror Attack 2008 : पाकिस्तानचे तब्बल १० दहशतवादी हे समुद्र मार्गे येत त्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर भ्याड हल्ला केला होता. त्यांनी मुंबईच्या विविध ठिकाणी अंधाधुंद गोळीबार करत तब्बल १६६ नागरिकांना ठार मारले होते. या घटनेमुळे केवळ मुंबई नाही तर संपूर्ण देशासह जग देखील हादरले होते. अखेर एनएसजी कमांडोनी मुंबई पोलिसांच्या मदतीने या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. तर कसाबला जीवंत पकडून नंतर फाशी देण्यात आली. हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस ठरला. या घटनेला आज १५ वर्ष पूर्ण झाले तरी भारताच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न आजही कायम आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Maharashtra weather update: राज्यात अवकळी पावसाला सुरुवात; साताऱ्याला झोडपले, मुंबईतही बरसला, 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट

२६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानातील कराचीहून १० दहशतवादी समुद्राच्या मार्गाने मुंबईत घुसले. त्यांनी दोन दोनच्या गटाने मुंबईत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरुवातीला हा गँगवॉरचा प्रकार असल्याचे पोलिसांना वाटले. मात्र, हा दहशतवादी हल्ला असल्याचे निष्पन्न झाले. यात मुंबई पोलिसांचे अनेक धाडसी अधिकारी देखील शहीद झाले. यानंतर अनेक चौकशी समित्या बनल्या. त्यांनी सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यास सांगत अनेक उपाय योजना करण्यास सांगितले. मात्र, १५ वर्ष उलटूनही मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न हा प्रलंबित आहे. किनाऱ्यावर आज देखील २४ तास गस्त घालण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तब्बल ११४ किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या बंदर परिमंडळ आणि मोटर परिवहन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. हा मोठा हलगर्जी पणा म्हणावा लागेल.

ओबीसी नेत्यांनी माझ्या नांदी लागू नये, मग ते भुजबळ असो किंवा शेंडगे; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत बोटी खरेदी करण्यात आल्या. तब्बल २३ बोटी खरेदी करण्यात आल्या. मात्र, १५ वर्षात केवळ ८ बोटी या चांगला असून इतर बोटी या किनाऱ्यावर पडून आहे. बंदर परिमंडळात यलो गेट, वडाळा, शिवडी, सागरी-१ आणि सागरी-२ ही पाच पोलिस ठाणी येतात. या पोलिस ठाण्यांसाठी २३५ अधिकारी तर १६०७ कर्मचारी मंजूर आहेत. मात्र या सर्व पोलिस ठाण्यात केवळ ५१८ पोलिसच कार्यरत आहेत.

सागरी सुरक्षा समितीने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक असुरक्षित लॅंडींग पॉइंट असल्याची बाब देखील पुढे आली आहे. यात बधवार पार्क, गीता नगर, गणेश मूर्ती नगर, वांद्रे-वरळी सी लिंक जेट्टी, जुहू चौपाटी, गोराई, मनोरी आणि वर्सोवा समुद्रकिनारा यांचा समावेश आहे. मुंबईवर पुन्हा समुद्र मार्गाने मोठा हल्ला होण्याची देखील शक्यता नाकारता येत नसल्याने या उणिवा तातडीने भरून काढणे गरजेचे आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या