मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway Mega Block : वंदे भारत ट्रेनसह राज्यातील अनेक रेल्वे रद्द; भुसावळ-मनमाड दरम्यान रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक

Railway Mega Block : वंदे भारत ट्रेनसह राज्यातील अनेक रेल्वे रद्द; भुसावळ-मनमाड दरम्यान रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक

Aug 13, 2023, 09:04 AM IST

    • Railway Mega Block : नवीन लाईन टाकण्यासाठी रेल्वेने भुसावळ ते मनमाड दरम्यान १५ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.
Mumbai Shirdi Railway Mega Block (Ashwini Vaishnaw twitter)

Railway Mega Block : नवीन लाईन टाकण्यासाठी रेल्वेने भुसावळ ते मनमाड दरम्यान १५ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.

    • Railway Mega Block : नवीन लाईन टाकण्यासाठी रेल्वेने भुसावळ ते मनमाड दरम्यान १५ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.

Mumbai Shirdi Railway Mega Block : मुंबईहून शिर्डीसाठी जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस अचानक रद्द करण्यात आली आहे. मनमाड ते भुसावळ दरम्यान १८३ किलोमीटरच्या तिसऱ्या नव्या मार्गिकेचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता भुसावळ यार्डमध्ये १४ आणि १५ ऑगस्ट रोजी १५ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांत तब्बल १५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं वंदे भारत ट्रेनसह अन्य ४० रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय अनेक रेल्वे ब्लॉक काळासाठी रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळं आता ऐन स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

मनमाड ते भुसावळ या मार्गावर नव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आल्याने शिर्डी ते मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच तब्बल ४० हून अधिक मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. काही रेल्वे पर्यायी मार्गांवर धावणार असून काही अंशत: रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता रेल्वेने पुढील तीन दिवसांच्या रेल्वेंचं वेळपत्रक जारी केलं आहे. त्यात कोणत्या रेल्वे रद्द करण्यात येणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे.

कोणत्या रेल्वे गाड्या रद्द होणार?

१३ ऑगस्ट म्हणजेच आज सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस आणि हजूर साहिब नांदेड-मुंबई एक्स्प्रेस या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. १४ ऑगस्टला म्हणजेच उद्या सीएसएमटी-साईनगर-सीएसएमटी शिर्डी वंदे भारत ट्रेन, देवळाली-भुसावळ मेल, सीएसएमटी-नांदेड, सीएसएमटी-जालना जनशताब्दी ट्रेन, मुंबई-नागपूर सेवाग्राम मेल, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस आणि मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या रेल्वे रद्द करण्यात येणार आहे.

याशिवाय १५ ऑगस्टला देवळाली-भुसावळ मेल, सीएसएमटी- नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड मेल, देवगिरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-हजूर साहिब नांदेड मेल या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. १४ ऑगस्टला मुंबई-मनमाड एक्स्प्रेस रद्द करण्यात करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला ही रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय दादर-साईनगर ही वंदे भारत एक्स्प्रेस शिर्डी-पुणे-दौंडमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पुढील बातम्या