मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rape: प्रेमाच्या जाळ्यात ओढून शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दीड वर्षानंतर आरोपीला अटक

Mumbai Rape: प्रेमाच्या जाळ्यात ओढून शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दीड वर्षानंतर आरोपीला अटक

Feb 14, 2023, 05:40 PM IST

  • Mumbai Crime: मुंबईतील कांदवली पोलिसांत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला दीड वर्षानंतर अटक केली आहे.

Pune Rape (HT_PRINT)

Mumbai Crime: मुंबईतील कांदवली पोलिसांत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला दीड वर्षानंतर अटक केली आहे.

  • Mumbai Crime: मुंबईतील कांदवली पोलिसांत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला दीड वर्षानंतर अटक केली आहे.

Mumbai News: लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दीड वर्षानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. पीडितावर बलात्कार केल्यानंतर आरोपी गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होता, अशी माहिती कांदिवली पोलिस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक दीप शिखा वारे यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

आरोपीने वारंवार खोट बोलून कुटुंबियांची दिशाभूल केली. एवढेच नव्हे तर, तो सारखे आपले राहणीमान आणि व्यवसायही बदलत होता. ठाणे जिल्ह्यातील पेल्हार पोलीस आरोपींना पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र, आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकण्यात यशस्वी होत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुमताज शेख (वय, ४०) असे आरोपीचे नाव आहे. लॉकडाऊनच्या काळात दीड वर्षांपूर्वी आरोपीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पेल्हार पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी फरार आहे. दरम्यान, आरोपी मुंबईतील कांदिवली परिसरात रिक्षा चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात पोलिसांनी आरोपीला भादंवि कलम ३६३, ३७६(२)(एन) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करत त्याची कारागृहात रवानगी केली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या