मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर.. दोन ठिकाणी झाडे कोसळून दोन तरुणाचा मृत्यू

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर.. दोन ठिकाणी झाडे कोसळून दोन तरुणाचा मृत्यू

Jun 28, 2023, 07:16 PM IST

  • Mumbai rain alert : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात मालाड व गोरेगाव येथे झाडे कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai rain update

Mumbai rain alert : मुंबईतगेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात मालाड व गोरेगाव येथे झाडे कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

  • Mumbai rain alert : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात मालाड व गोरेगाव येथे झाडे कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai rain update: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, उपनगरे व ठाण्यात पावसाने कहर केला असून रस्त्यांना तलावाचे रुप आले आहे. अनेक ठिकाणी पावसासोबत जोरदार वारे वाहत असल्याने झाडे उन्मळून पडल्याच्या व घरे कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

प्रेमलाल निर्मल (वय ३०) असे मृत तरुणाचं नाव आहे.  झाड कोसळून व्यक्तींचा मृत्यू होण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.

आज सकाळी मालाड पश्चिम येथे एका खाजगी कंपाऊंडमध्ये पिपळाचे झाड कोसळल्याने कौशल्य दोशी या ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

मंगळवार पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसासोबत जोरदार वारा देखील वाहत असल्याने जुनी झाडे कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. गोरेगाव एमजी रोड परिसरातील मीठानगर महापालिका कॉलनीत दुपारच्या सुमारास एका घरावर झाड कोसळल्याची घटना घडली.

या दुर्घटनेत बी २२ ए या घरात राहणाऱ्या ३० वर्षीय प्रेमलाल निर्मल या तरुणाला गंभीर दुखापत झाली. शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या