मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune expressway : कोंडी फुटली! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने ३५ तासांनंतर घेतला मोकळा श्वास

Mumbai Pune expressway : कोंडी फुटली! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने ३५ तासांनंतर घेतला मोकळा श्वास

Dec 25, 2023, 11:48 AM IST

  • Pune Mumbai expressway traffic jam update : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी तब्बल ३५ तासानंतर सोडवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.

Pune mumbai expressway traffic jam update

Pune Mumbai expressway traffic jam update : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी तब्बल ३५ तासानंतर सोडवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.

  • Pune Mumbai expressway traffic jam update : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी तब्बल ३५ तासानंतर सोडवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.

mumbai pune express way news : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर अनेक वाहने गरम झाल्यामुळे बंद पडली होती. अनेकांची सुट्टी ही वाहतूक कोंडीतच वाया गेली. ही वाहतूक कोंडी सोडवतांना पोलिसांची दमछाक झाली. अखेर ३५ तासानंतर येथील वाहतूक सुरळीत झाल्याने या महामार्गाने देखील मोकळा श्वास घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Vivek Bindra : मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्राला अटक होणार! पोलिसांच्या हाती सबळ पुरावे

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवार पासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी रात्री तर १० ते १२ किमीचा रांगा लागल्या होत्या. त्यात महामर्गावर अनेक वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडली होती. नागरीक या कोंडीत अडकल्याने वैतागले होते. अखेर या मार्गवारील वाहतूक ही सुरळीत करण्यास पोलिसांना यश आले आहे.

Mumbai firing : मुंबईतील चुनाभट्टी परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार! एक ठार, तिघे जखमी

बोरघाटामधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रायगड महामार्ग पोलिसांकडून मुंबईहून पुण्याला येणारी लेन आणि पुण्याहून मुंबईला जाणारी लेन या दोन्हीही लेनवर मुंबई कडून येणारी वाहतूक सुरू करण्यात आल्याने अखेर वाहतूक सुरळीत झाली. या साठी सुमारे ३५ तास लागले. मात्र, ही कोंडी फोडतांना त्यांची मोठी दमछाक आणि कसरत करावी लागली.

शनिवार पासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक रखडली होती. बोरघाटात अनेक वाहने बंद पडली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती. जुन्या मुंबई पुणे मार्गांवर देखील हीच परिस्थिती होती. शिंग्रोबाच्या अलीकडे पासून रस्त्यातच वाहने बंद पडली होती. या वाहतूक कोंडीत महिला, लहान मुले अडकून पडल्याने अनेक नागरीक हे कंटाळून रस्तावर येऊन बसले होते. यामुळे अनेकांना सुट्टी ही महामार्गावरच घालवावी लागली होती.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या