मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Threat Call : मुंबईत पुन्हा होणार मोठ कांड! गुजरातची समा आणि काश्मिरचा आसिफ करणार घातपात; मुंबई पोलिसांना धमकी

Mumbai Threat Call : मुंबईत पुन्हा होणार मोठ कांड! गुजरातची समा आणि काश्मिरचा आसिफ करणार घातपात; मुंबई पोलिसांना धमकी

Nov 22, 2023, 11:19 AM IST

    • Mumbai Police Threat Call: मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या फोनमुळे मुंबई पोलिस अलर्ट मोडवर असून हा फोन कोठून याला याचा शोध घेतल्या जात आहे.
Mumbai Police (PTI)

Mumbai Police Threat Call: मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या फोनमुळे मुंबई पोलिस अलर्ट मोडवर असून हा फोन कोठून याला याचा शोध घेतल्या जात आहे.

    • Mumbai Police Threat Call: मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या फोनमुळे मुंबई पोलिस अलर्ट मोडवर असून हा फोन कोठून याला याचा शोध घेतल्या जात आहे.

Mumbai Terrorist Attack : मुंबई पोलिसांना फोनवरुण धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी देण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा मुंबईत घातपात करण्यात येणार असल्याचा धमकीवजा फोन आला. यावेळी धमकी देणाऱ्याने नावे घेतली असून गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ हा मुंबईत घातपात करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai air pollution : मुंबईतील धूळ कमी करण्यासाठी १ हजार टँकर भाड्यानं घेतले जाणार! कृत्रिम पावसाचाही विचार

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण होत आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, या घटनेला १५ वर्ष पूर्ण होत असतांना मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Parbhani News: कोर्टात अर्धा तास उशिरा पोहचणं दोन पोलिसांना पडलं महागात; न्यायाधीशांनी दिली 'ही' शिक्षा ऐकून व्हाल थक्क

मुंबई पोलिसांना एका निनावी माणसाने फोन करून मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचे सांगत मुंबईत मोठा कांड होणार आहे". यात गुजरातची सना आणि काश्मीरचा आसिफ हे मोठा घातपात करणार आसल्याचे फोन करणाऱ्याने म्हटले आहे. हा फोन घेणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याने अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. एटीएसच्या अधिकाऱ्यांना ओळखत असल्याचे शोएब नावाच्या कॉलरने म्हटले आहे. घातपात घडवणारे समा आणि आसिफचे हे एकमेकांच्या संपर्कात असून त्याचे फोन नंबर देखील पोलिसांना देण्यात आल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सध्या सर्व यंत्रणांना अलर्ट केले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात देखील असाच धमकीचा फोन मुंबई पोलिसांना मिळाला होता. यावेळी २६/११ हल्ला पुन्हा करणार असल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन आले आहे. हल्लेखोरांनी अनेक वेळा खोट्या धमक्या दिल्या आहेत. यावेळी नावे सांगितल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या