मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai metro : मेट्रो २ अ आणि ७ च्या फेऱ्या वाढवल्या, आता शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटणार

Mumbai metro : मेट्रो २ अ आणि ७ च्या फेऱ्या वाढवल्या, आता शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटणार

Feb 13, 2023, 10:53 PM IST

  • Mumbai metro 2 A And 7 : मंबई मेट्रो २ अ आणि ७ मार्गावर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून . या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे.

Mumbai metro

Mumbai metro 2 A And 7 : मंबई मेट्रो २ अ आणि ७ मार्गावर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून . या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे.

  • Mumbai metro 2 A And 7 : मंबई मेट्रो २ अ आणि ७ मार्गावर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून . या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे.

मुंबईकरांना खुशखबर आहे. मेट्रोच्या सेवा वेळात वाढ करण्यात आली आहे. मेट्रो २ अ व मेट्रो ७ मार्गावर मेट्रोच्या फेरीच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेच्या सेवा वेळेत वाढ करण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओपीएल) घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून (मंगळवार) आता शेवटची गाडी रात्री १०.०९ ऐवजी रात्री १०.३० ला सुटणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंबई मेट्रो २ अ आणि ७ मार्गाचे लोकार्पण केले होते. त्यानंतर ही सेवा पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल झाली आहे. या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे. अशी माहिती महानगर आयुक्त आणि एमएमएमओपीचे अध्यक्ष एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली आहे.

मुंबई मेट्रो २ अ मार्गावर अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्वदरम्यान दोन फेऱ्या वाढणार आहेत. एक रात्री २२.२० वाजता आणि एक रात्री २२.३० वाजता अशा या दोन वाढीव फेऱ्या असतील. गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्वदरम्यानही दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री २२.२० आणि २२.३० या वेळेत या वाढीव फेऱ्या होतील. एमएमएमओपीएलच्या निर्णयानुसार मंगळवारपासून या अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत. ही वाढीव फेऱ्या पुढील दोन महिन्यासाठी असतील. नव्या वेळापत्रकानुसार आता गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची गाडी रात्री २१.३० वाजता, गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची गाडी रात्री २२.३० वाजता सुटणार आहे. गुंदवलीसाठी अंधेरी पश्चिमेकडून शेवटची गाडी रात्री २१.३० वाजता, अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची गाडी रात्री २२.३० वाजता, दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची गाडी २२.०३ वाजता, दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी शेवटची गाडी रात्री २२.०८ वाजता,  डहाणूकर वाडीसाठी दहिसर पूर्वेकडून शेवटची गाडी रात्री २३.११ वाजता सुटणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या