मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Mega Block: रविवारी सेंट्रल रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

Mumbai Mega Block: रविवारी सेंट्रल रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

Nov 18, 2023, 11:01 PM IST

  • Mumbai local Megablock : रविवारी (१९ नोव्हेंबर) अभियांत्रिकी व दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून याचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

Mumbai local Megablock

Mumbai local Megablock : रविवारी (१९ नोव्हेंबर) अभियांत्रिकी व दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून याचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

  • Mumbai local Megablock : रविवारी (१९ नोव्हेंबर) अभियांत्रिकी व दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून याचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. १९ नोव्हेंबर रोजी सेंट्रल रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार असा हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्याचप्रमाणे हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प राहणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

मागील रविवारी दिवाळी असल्याने मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता. पण या रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.४८ ते दुपारी  ३.४९ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच हार्बर मार्गावर सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४० असा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाउन स्लो लाइन सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत बंद.

सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी डाउन स्लो सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसआणि विद्याविहार स्टेशनदरम्यान डाउन फास्ट लाइनवर डायवर्ट केली जाईल. भायखळा, परेल, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्टेशनवर थांबेल आणि पुढे डाउन स्लो लाइनवर डायवर्ट केली जाईल.

सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत  घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाणार होत्या. त्यानंतर कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

दरम्यान मेगाब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लेटफॉर्म नंबर ८) दरम्यान विशेष सेवा सुरू राहतील. हार्बर लाइनच्या प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्ये लाइन आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी असेल.

पुढील बातम्या