मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mega Block : घटस्थापनेच्या दिवशीच मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा बघा वेळापत्रक

Mega Block : घटस्थापनेच्या दिवशीच मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा बघा वेळापत्रक

Oct 13, 2023, 08:17 PM IST

  • Mumbai mega block : मुंबईत मध्य रेल्वे विभागाचा येत्या रविवार रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे.

Mumbai mega block

Mumbai mega block : मुंबईत मध्य रेल्वे विभागाचायेत्यारविवार रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

  • Mumbai mega block : मुंबईत मध्य रेल्वे विभागाचा येत्या रविवार रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे.

Mumbai Local Train Mega Block : मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवशी भाविक देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडणार असतील तर आधी मेगाब्लॉकची माहिती घेणे गरजेचे आहे.  अन्यथा त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

मुंबईत मध्य रेल्वे विभागाचा येत्या रविवार (१५ ऑक्टोबर) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. ५व्या आणि ६व्या मार्गासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक चालवणार आहे. ठाणे-कल्याण ५व्या आणि ६व्या  मार्गावर मध्यरात्री ०१.०० ते ०४.०० पर्यंत असणार आहेत. 

मध्य व हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

  • कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या  रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व सर्वा गाड्या गंतव्य स्थानावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ०४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता मेगाब्लॉक असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी  ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. 
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
  • गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. 

 हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पुढील बातम्या