मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या.. हार्बर अन् ट्रान्स हार्बर लोकल प्रवास होणार वेगवान! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या.. हार्बर अन् ट्रान्स हार्बर लोकल प्रवास होणार वेगवान! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Nov 28, 2023, 05:58 PM IST

  • Mumbai local train : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर असून या मार्गावरील लोकल रेल्वेचा वेग वाढवला जाणार आहे.

Mumbai local train

Mumbai local train : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर असून या मार्गावरील लोकल रेल्वेचा वेग वाढवला जाणार आहे.

  • Mumbai local train : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर असून या मार्गावरील लोकल रेल्वेचा वेग वाढवला जाणार आहे.

Local Train Update: हार्बर व ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहेत. मध्य रेल्वेकडून हार्बर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील ट्रेन्सचा वेग मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांचा वेग वाढवला जाणार असून लवकरच हे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी रेल्वे मार्गालगतचे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील रेल्वेचा वेग सध्या सरासरी ८० किमी प्रतितास इतका आहे. मात्र हा वेग वाढवून १०५ प्रतितास केला जाणार आहे. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. 

मध्य रेल्वेवर अतिक्रमणची समस्या सर्वाधिक हार्बर रेल्वे मार्गावर आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वडाळा, मानखुर्द, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर येथे अधिक अतिक्रमण झालं आहे. येथे रेल्वे ट्रॅकच्या जवळच अवैध बांधकाम करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवताना अनेक वेळी राजकीय विरोधाचा सामना करावा लागतो. रेल्वे रूळांशेजारी राहणारे लोक रुळालगतच कचरा फेकतात, घरातील सांडपाणी ट्रॅकवर साचते. या सगळ्यांमुळं रुळांचे नुकसान होते आणि म्हणूनच लोकलचा वेग मंदावतो. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटवल्यानंतर रेल्वेकडून इंजिनियरिंग वर्क सुरू करण्यात येईल. यात रुळांच्या मजबुतीकरणासाठी काम प्रामुख्याने करण्यात येईल. रुळांच्या खाली असलेली गिट्टी बदलण्यात येईल. अनेक ठिकाणी सिग्नलचे केबल्स बदलण्यात येतील. ही सर्व कामे झाल्यानंतर लोकल ट्रेनचा स्पीड वाढवण्यात येईल. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या