मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द, पाहा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द, पाहा वेळापत्रक

Jul 16, 2023, 06:12 AM IST

    • Mumbai Local Mega Block : रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची उद्या मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Mega Block (HT)

Mumbai Local Mega Block : रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची उद्या मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

    • Mumbai Local Mega Block : रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची उद्या मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

Mumbai Local Mega Block Update : मुंबईतील तिन्ही मार्गांवर आज रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईतील हार्बर, सेन्ट्रल आणि वेस्टर्न मार्गांवर सकाळी ११ वाजता मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं वीकेंडला तुम्ही बाहेर पडणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहायलाच हवं. मेगाब्लॉकमुळं शहरातून बाहेर फिरण्यासाठी आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. रेल्वेने अनेक लोकल अन्य मार्गांवरून वळवल्या असून नवीन वेळापत्रक जारी केलं आहे. सेन्ट्रल लाईनवरील माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली ते राम मंदिर अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक घेण्यात आलेला असताना या मार्गावरील अनेक लोकल अंधेरी ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावरील अनेक लोकल ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हार्बर लाईनवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वडाळा ते वाशी, बेलापूर-पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी ते वांद्रे आणि गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेमागावरील माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते ठाण्यातील मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या मार्गावर धावणाऱ्या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबणार आहे. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल ठाणे-माटुंगा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.

पुढील बातम्या