मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block: मुंबईत लोकलचा आज मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर वाहतूक बंद, प्रवाशांनी दखल घेण्याचे आवाहन

Mumbai Local Mega Block: मुंबईत लोकलचा आज मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर वाहतूक बंद, प्रवाशांनी दखल घेण्याचे आवाहन

Dec 11, 2022, 09:25 AM IST

    • Mumbai Local Mega Block: रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील अनेक लोकल बंद राहणार असून याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे.
Mumbai Local Railway (HT)

Mumbai Local Mega Block: रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील अनेक लोकल बंद राहणार असून याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे.

    • Mumbai Local Mega Block: रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील अनेक लोकल बंद राहणार असून याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे.

मुंबई : रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील अनेक लोकल बंद राहणार असून याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे. या मेगाब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे लोकल उशिराने धावणार आहे. तर काही एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक वळवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

या मेगाब्लॉक मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान, सकाळी १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान वसई रोड-दिवा मेमू वसई रोडवरून सकाळी ९.५० वाजता सुटणारी कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल आणि दिवा-वसई रोड मेमू सकाळी ११.३० वाजता सुटणारी दिवा ऐवजी कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटणार आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर पाचव्या आणि सहाव्या मार्गांसाठी मेगा ब्लॉक ठेवण्यात आला असून या दरम्यान, या मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार असल्याने ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी लाईन सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यन्त हा ब्लॉक राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

या मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग हा बदलण्यात आला आहे. पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पाटणा-एलटीटी एक्सप्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगत एक्सप्रेस, बनवा - एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या