मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांच्या खिशाला कात्री.. ‘बेस्ट’चा पास महागला; आता मोजावे लागणार इतके रुपये

मुंबईकरांच्या खिशाला कात्री.. ‘बेस्ट’चा पास महागला; आता मोजावे लागणार इतके रुपये

Feb 29, 2024, 10:54 PM IST

  • Mumbai Best Bus pass more expensive : बेस्ट प्रशासनाने मासिक पासच्या दरात वाढ केली आहे. मासिक तसेच दैनंदिन पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

Mumbai Best Bus pass more expensive

Mumbai Best Bus pass more expensive : बेस्ट प्रशासनाने मासिक पासच्या दरात वाढ केली आहे. मासिक तसेच दैनंदिन पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

  • Mumbai Best Bus pass more expensive : बेस्ट प्रशासनाने मासिक पासच्या दरात वाढ केली आहे. मासिक तसेच दैनंदिन पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

सुट्ट्या पैशांची झिकझिक नको म्हणून बेस्टने रोज प्रवास करणारे अनेक मुंबईकर मासिक पासचा पर्याय निवडतात. मात्र स्वस्त सेवेसाठी ओळखल्या जाणारे बेस्ट प्रशासनाने मासिक पासच्या दरात वाढ केली आहे. मासिक तसेच दैनंदिन पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. मासिक पासच्या दरात १५० रुपयांनी तर रोजच्या पास दरात १० रुपयांनी वाढ केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

नव्या दरानुसार मासिक पाससाठी आता ७५० रुपयांऐवजी ९०० रुपये, तर दैनंदिन पाससाठी ५० ऐवजी ६० रुपये मोजावे लागणार आहेत. नवे दर उद्यापासून (१ मार्च) लागू होणार आहे. मात्र दैनंदिन तिकिटात वाढ करण्यात आलेली नाही.

शालेय विद्यार्थ्यांना २०० रुपयांचा मासिक बस पास उपलब्ध असून या बस पासच्या माध्यमातून अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे. मासिक व डेली पासमध्ये अमर्याद प्रवास, सर्व एसी बसमधून प्रवासाची सुविधा कायम असल्याचे बेस्टने म्हटले आहे. बस पास सहा रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपयांपर्यंतच्या वातानुकूलित आणि विनावातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. 

बेस्ट प्रशासनाने पासचे दर वाढवल्यामुळे १० लाख ४० हजार ९६५ प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. रेल्वेनंतर सर्वाधिक प्रवासी ‘बेस्ट’ ने प्रवास करतात. ‘बेस्ट’ बस दररोज ३५ लाख प्रवाशांची ने-आण करत असते. 

बेस्टने पास योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना मासिक बस पासमध्ये असलेली ५० रुपये सवलत कायम ठेवली आहे. मात्र साप्ताहिक बस पासमध्ये मात्र कोणतीही सवलत नाही. दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बस पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या