मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अनिल परबांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी ३ तास चर्चा; कार्यालयातून बाहेर येताच सोमय्यांबद्दल म्हणाले...

अनिल परबांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी ३ तास चर्चा; कार्यालयातून बाहेर येताच सोमय्यांबद्दल म्हणाले...

Jan 31, 2023, 06:41 PM IST

  • Anil Parab On Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या वांद्रे येथील कार्यालयाशी माझा संबंध नसल्याचे शिवसेना आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे.

Anil Parab On Kirit Somaiya

Anil Parab On Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या वांद्रे येथील कार्यालयाशी माझा संबंध नसल्याचे शिवसेना आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे.

  • Anil Parab On Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या वांद्रे येथील कार्यालयाशी माझा संबंध नसल्याचे शिवसेना आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे.

Mumbai News: वांद्रे येथील कार्यालय माझे नसून सोसायटीचं आहे,असा लेखी पुरावा देत म्हाडाने किरीट सोमय्यांचे आरोप खोटे ठरवले आहेत. हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल, अशा शब्दात शिवसेना आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर अनिल परब यांनी आज म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

याप्रकरणी अनिल परब यांनी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत तब्बल ३ तास चर्चा केली. त्यानंतर म्हाडा कार्यालय बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. "मी वारंवार सांगितलं की जागा माझी नाही तर सोसायटीची आहे. कार्यालय मला वापरण्यासाठी सोसायटीने दिले होते. हे कार्यालय माझे आहे, हा आरोप खोटा आहे. किरीट सोमय्या खोटे बोलत आहेत, या जागेशी माझा कुठलाही संबंध नाही. परिच्छेद क्रमांक एक मध्ये लिहिलं आहे की, गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ या दोन इमारतींच्यामध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत म्हाडा कार्यालयातील नस्तीचं अवलोकन करता सदर अनधिकृत बांधकामाशी माननीय आमदार अनिल परब यांचा काहीही संबंध नाही, असे म्हाडाच्या लेखी पुराव्यात दिले आहे."

याशिवाय, नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. ज्या अधिकाऱ्याने कोणतीही शाहनिशा न करता नोटीस पाठवली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अनिल परब म्हणाले. पुढच्या आठ दिवसात मला जागेचे नकाशे मिळालेच पाहिजेत. आज माझ्याकडे पुरावा आहे आणि हाच पुरावा सोमय्यांना नाक घासायला लावेल, अशा शब्दात अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. याचबरोबर,किरीट सोमय्यांना नोटंकी करण्याची सवय आहे, असेही परबांनी म्हटले आहे.

पुढील बातम्या