मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Airport : मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने प्रवाशांना दिली सेवा

Mumbai Airport : मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने प्रवाशांना दिली सेवा

Nov 19, 2023, 06:26 PM IST

  • Mumbai Airport : मुंबई विमानतळाने  एका दिवसात १ लाख ६१ हजार ७६० प्रवाशांना सेवा देत विक्रम केला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Mumbai Airport

Mumbai Airport : मुंबई विमानतळाने एका दिवसात १ लाख ६१ हजार ७६० प्रवाशांना सेवा देत विक्रम केला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

  • Mumbai Airport : मुंबई विमानतळाने  एका दिवसात १ लाख ६१ हजार ७६० प्रवाशांना सेवा देत विक्रम केला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मुंबई एअरपोर्टने (Mumbai Airport) ऐतिहासिक कामगिरी करत मैलाचा दगड पार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA) वर एकाच दिवशी विक्रमी १ लाख ६१ हजार ७६० प्रवाशांना सेवा दिली. सीएसएमआयए सध्या केवळ सिंगल रनवे विमानतळाच्या रुपात कार्यरत आहे. मुंबई विमानतळाच्या या विक्रमी कामगिरीबद्दल अदानी ग्रुपचे चेयरमन गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

अदानी ग्रुपचे चेयरमन गौतम अदानी यांनी म्हटले की, "ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. ११ नोव्हंबर रोजी आम्ही २४ तासात १,०३२ उड्डणे करत विश्वविक्रम नोंदवत सर्वात व्यस्त एअर ट्रॅफिक दिवस साजरा केला आणि आज आम्हाला मुंबई विमानतळावर नवा मैलाचा दगड रचण्याचा सन्मान प्राप्त झाला. यासिंगल रनवे विमानतळाने एका दिवसात विक्रमी १,६१,७६०प्रवाशांना सेवा दिली आहे. यासाठी एएआय, सीआयएसएफ, इमीग्रेशन आणि कस्‍टम तसेच अदानी टीमच्या अथक प्रयत्नांना सलाम.  जय हिन्द."

 

दीवाळी निमित्त मुंबई एअरपोर्ट (Mumbai Airport) हून एक हजाराहून अधिक फ्लाइटचे एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (ATM) नोंदवले गेले. ११ नोव्हेंबर रोजी १०३२ फ्लाइट्स टेकऑफ आणि लँडिंग करण्यात आले. हीCSMIA साठी मोठे यश आहे. आता एका दिवसात १,६१,७६० प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम बनवला गेला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mumbai International Airport)व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. यापूर्वी, एका दिवसात १०३२ हवाई वाहतुकीचा विक्रम नोंदवल्यानंतर,मुंबई विमानतळाने ११ नोव्हेंबर रोजी १,६१,४१९ प्रवाशांना सेवा दिली होती, आज हा विक्रम मोडला गेला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या