मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Air Quality : पावसामुळे मुंबईकरांना अच्छे दिन! हवेची गुणवत्ता सुधारली

Mumbai Air Quality : पावसामुळे मुंबईकरांना अच्छे दिन! हवेची गुणवत्ता सुधारली

Nov 27, 2023, 02:47 PM IST

  • Mumbai Air Quality Improve due to Unseasonal Rain : हवेतील प्रदूषणामुळं श्वास कोंडलेल्या मुंबईकरांना अवकाळी पावसानं मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai Air Quality

Mumbai Air Quality Improve due to Unseasonal Rain : हवेतील प्रदूषणामुळं श्वास कोंडलेल्या मुंबईकरांना अवकाळी पावसानं मोठा दिलासा दिला आहे.

  • Mumbai Air Quality Improve due to Unseasonal Rain : हवेतील प्रदूषणामुळं श्वास कोंडलेल्या मुंबईकरांना अवकाळी पावसानं मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai Air Quality Index news : दिवाळीत मुंबईत फोडण्यात आलेल्या फटक्यांमुळे मुंबईची हवा सर्वाधिक प्रदूषित झाली होती. हवेचा गुणवत्ता निर्देशांकात कमालीची वाढ झाली होती. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या फटाक्यांचा धूर केला होता. यामुळे मुंबईचा AQI तब्बल २८८ वर जाऊन पोहचला होता यामुळे मुंबईकारांना श्वास घेणे देखील कठीण झाले होते. यामुळे मुंबई पालिकेने धूलिकण कमी करण्यासाठी १००० टँकर भाड्याने घेण्याचे नियोजन केले. दरम्यान, मुंबईत रविवारी झालेल्या अवकाली पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. मुंबईच्या AQI कमी झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Lightning Strikes In Gujarat : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ! वीज कोसळून तब्बल २० नागरीक ठार

जगभरात सर्ववधिक प्रदूषित शहर म्हणून पहिल्या १० क्रमांकाच्या शहराच्या यादीत मुंबईच्या क्रमांक लागला आहे. येथील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना श्वासनांचे आजार होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे केंद्राने याची दखल घेत यावर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने देखील एमपीसीबीला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार अनेक बांधकाम प्रकल्प आणि सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

Mumbai fire : मुंबईतील आग्रीपाडा येथे २२ मजली इमारतीला भीषण आग; बचावकार्य सुरू

दरम्यान, हा प्रश्न गंभीर झाला असतांना मुंबईत झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. मुंबईच्या प्रदूषण या पावसामुळे कमी झाले असून हवा गुणवत्ता निर्देशांक हा सुधारू लागला आहे. मुंबईत विविध भागांचा हवा गुणवत्ता निर्देशांक सफरने जाहीर केला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा २८८ वरुन ६० वर आला आहे. कुलाबा येतील एक्युआयहा ७६ तर, भांडुप येथील एक्युआय हा ३७, मालाड येथील एक्युआय हा ३५, तर माझगाव येथील एक्युआय हा ४७, तर वरळी येथील एक्युआय हा ३३, बोरिवली येथील एक्युआय हा ६५, बीकेसी येथील एक्युआय हा १०३, चेंबूरचा एक्युआय हा ८९, अंधेरीचा एक्युआय हा ६७, तर नवी मुंबईचा एक्युआय हा ५३ नोंदवण्यात आला आहे.

मुंबईत बीकेसीचा एक्युआय हा सर्वाधिक जास्त आहे. येथील AQI हा १०३ वर आहे. दरम्यान, मुंबईत आणखी काही दिवस पाऊस राहणार असून यामुळे पुन्हा हवेची गुणवत्ता सुधारणार असल्याने मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या