मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईच्या मुलुंड परिसरात भरधाव दुचाकीनं महिला पोलिसाला उडवलं!

Mumbai: मुंबईच्या मुलुंड परिसरात भरधाव दुचाकीनं महिला पोलिसाला उडवलं!

Dec 27, 2023, 06:12 PM IST

    • Speeding Two Wheeler Hit Policewoman: मुंबईच्या मुलुंड परिसरात भरधाव दुचाकीनं एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला उडवले.
Mulund Accident

Speeding Two Wheeler Hit Policewoman: मुंबईच्या मुलुंड परिसरात भरधाव दुचाकीनं एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला उडवले.

    • Speeding Two Wheeler Hit Policewoman: मुंबईच्या मुलुंड परिसरात भरधाव दुचाकीनं एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला उडवले.

Mumbai Mulund Bike Accident: मुंबईच्या मुलुंड परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव दुचाकीने महिला पोलीस अधिकाऱ्याला जोरदार धडक दिली. या घटनेत महिला पोलिसाच्या नाकाला आणि तोंडाला जबर मार लागल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

अरविंद यादव असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर, पूजा धाकतोडे असे जखमी झालेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पूजा धाकतोडे मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस अधिकारी मंगळवारी रात्री काही सहकाऱ्यांसह परिसरात गस्त घालण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने त्यांना जोरधार धडक दिली. या दुचाकीवर तिघेजण होते.

या धडकेत महिला पोलिसांच्या नाकाला आणि तोंडाला जबर मार लागला. मुलुंड पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

करमाळा: कंटेनर आणि जीपच्या अपघातात ४ ठार

कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक सालसेकडून तवेरा गाडीने शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. करमाळा येथे फिसरे रस्त्यावर कंटेनर आणि तवेराची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. चार जण जखमी झाले. हा अपघात आज सकाळी पहाटेच्या सुमारास झाला. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय, ५६), शशिकला श्रीशैल कुंभार (वय, ५०), ज्योती दिपक हुवशालमठ (वय, ३८) आणि शारदा दिपक हिरेमठ (वय, ७०) अशी मृतांची नावे आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या