मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  26/11 : तिच्या साक्षीने कसाब लटकला फासावर! आजही भीतीने येतो अंगावर काटा; देविकाने सांगितला थरारक अनुभव

26/11 : तिच्या साक्षीने कसाब लटकला फासावर! आजही भीतीने येतो अंगावर काटा; देविकाने सांगितला थरारक अनुभव

Nov 26, 2023, 01:09 PM IST

    • 26/11 mumbai attack: मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी असलेल्या देविका ही तेव्हा केवळ ९ वर्षांची होती. तिने तिच्या डोळ्यासमोर हा सर्व भयंकर प्रकार पहिला होता. आज ही देविका २४ वर्षांची झाली असून या हल्ल्याच्या आठवणीने ती शहारून येथे.
26/11 mumbai terror attack

26/11 mumbai attack: मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी असलेल्या देविका ही तेव्हा केवळ ९ वर्षांची होती. तिने तिच्या डोळ्यासमोर हा सर्व भयंकर प्रकार पहिला होता. आज ही देविका २४ वर्षांची झाली असून या हल्ल्याच्या आठवणीने ती शहारून येथे.

    • 26/11 mumbai attack: मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी असलेल्या देविका ही तेव्हा केवळ ९ वर्षांची होती. तिने तिच्या डोळ्यासमोर हा सर्व भयंकर प्रकार पहिला होता. आज ही देविका २४ वर्षांची झाली असून या हल्ल्याच्या आठवणीने ती शहारून येथे.

26/11 mumbai terror attack : २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात तब्बल १६६ नागरिकांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. कसाबच्या गोळीबाराची प्रत्यक्षदर्शी असलेली देविका ही हल्ल्याच्या वेळी केवळ ९ वर्षांची होती. देविकाने न्यायालयात कसाबची ओळख पटवून त्याला फासावर पोहचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. हल्ल्याच्या वेळी नऊ वर्षांची असलेली देविका रोटादन आज २४ वर्षांची झाली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर देविकाचे आयुष्य बदलून गेले. या काळात कौन बनेगा करोडपती ते अनेक डान्स शोमध्ये देविका दिसली आहे. पण या हल्ल्याची आठवणीने आजही भीतीने ती शहारून जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

pimpri chinchwad crime: चोरी करण्यासाठी साथ दिली नाही म्हणून महिलेचे पाडले दात; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

आज या हल्ल्याला १५ वर्षपूर्ण झाले आहेत. या हल्ल्याबद्दल बोलतांना देविका म्हणते २६/११ ही घटना लक्षात ठेवण्यासाठी वर्षपूर्तीची गरज नाही. १५ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर दहशतवादी अजमल कसाबने हत्याकांड घडवून आणले तेव्हा देविका नऊ वर्षांची होती. या हल्ल्याची सर्वात लहान साक्षीदारही देविका होती. देविकाने कोर्टात कसाबला ओळखत साक्ष दिली होती.

देविका म्हणते, "२००९ मध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान मी कसाबला ओळखले, तेव्हा मी १० वर्षांची होती. कसाबने माझ्याकडे एका नजरेने पाहिले आणि मग डोळे खाली केले. न्यायालयाने त्याला फाशीशी शिक्षा सुनावली. न्याय निवडा झाला असली तरी माझ जीवन सोपे नव्हते. अनेक शाळांनी भीतीपोटी मला प्रवेश दिला नाही. माझ्या राहण्याने मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण शाळांनी दिले होते. मी माझा अभ्यास कसा तरी पूर्ण केला. होय, अनेक संस्थांकडून आर्थिक पाठबळ आणि सरकारी मदत सुद्धा मला मिळत राहिली. कारण माझ्या वडिलांचे उत्पन्न तेवढे नाही. हल्ल्यानंतर आमचे दुकानही बंद झाले होते.

ratnagiri temple dress code : रत्नागिरीच्या मंदिरांना भेट देणार असाल तर ही बातमी वाचा; तब्बल ५० मंदिरात ड्रेसकोड लागू

त्या दिवशी काय झाले

२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस आठवतांना देविकाच्या अंगावर भीतीने शहारे येतात. देविका म्हणाली, मी माझे वडील आणि भावासोबत मुंबईच्या सर्वात गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर लोकल पडकण्यासाठी थांबलो होटो, तेव्हा तिच्या उजव्या पायाला गोळी लागली. त्यावेळी देविका खूप लहान होती. तिने कसाबला बेछूट गोळीबार करतांना पाहिले. दरम्यान, रक्तस्त्राव झाल्याने ती बेशुद्ध पडली. तरीही त्या भयानक दिवसाची आठवण तिच्या मनावर आजही कोरली आहे. गोळीबारात अनेक नागरीक ठार झाले होते. तर काही नागरीक हे जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत होती. स्थानकावर अनेक मृतदेह पडले होते.

देविकाला आयपीएस व्हायचे आहे

देविका म्हणाली, मला दहशतवाद जवळून पहिला. कसाबने गोळ्या झाडल्यानंतर, मला ६ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि सुमारे ६५ दिवस मी रुग्णालयात राहिली होती. दहशतवाद संपवण्यासाठी मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. सध्या माझी गरज आहे ती स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला आधार देण्याची. “मी सध्या माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे.”

देविका सध्या वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) च्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिचे वडील वृद्ध झाले आहेत आणि सध्या त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे देविका सध्या नोकरीच्या शोधात आहे. देविका म्हणाली, "मला खूप आश्वासने दिली गेली. पण मला मदत मिळाली नाही. शेवटी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मी कोणत्या संघर्षातून गेली आहे हे मलाच माहिती आहे.

आई गेली, वडिलांची नोकरी गेली

२००६ मध्ये प्रदीर्घ आजारपणामुळे देविकाने तिची आई गमावली. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी तिचे वडील सुका मेवा विकायचे. मात्र, देविकाच्या उपचारासाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत असतानाच त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. त्याला दोन मोठे भाऊ आहेत - एक त्याच्या कुटुंबासह पुण्यात राहतो; तर दुसरा मणक्याच्या संसर्गामुळे अपंगत्वाने ग्रस्त आहे. देविका तीन वर्षात बरी झाली. तिला २०१४ मध्ये क्षयरोग झाल्याचे निदान झाले आणि तिला बराच काळ उपचार घ्यावे लागले होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या